विवेकानंद कॉलेजची राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड
schedule22 Sep 24 person by visibility 175 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित १८ सप्टेंबर २०२४ रोजी डेरवण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या विभागीय स्तर टेबल टेनिस स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये विवेकानंद महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला. या महाविद्यालयाच्या संघाची परभणी येथे २३ ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत कोल्हापूर मनपा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सांगली मनपा, इचलकरंजी मनपा, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश होता. संघामध्ये केतन विनायक सुतार, वेदांत रघुनाथ जोग, वैभव रघुनाथ जोग, शिवम राजू गुप्ता सोहम शिवकुमार चव्हाण या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे , संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, रजिस्ट्रार आर.बी.जोग, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, श्री सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.