प्रामाणिकपणाचे फळ म्हणून जिल्हाप्रमुखपदी निवड-रविकिरण इंगवले
schedule03 Jul 25 person by visibility 14 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ शिवसेना पक्षप्रमुख उद्ध्व ठाकरे यांनी, प्रामाणिकपणाचे फळ म्हणून माझी जिल्हाप्रमुखपदी निवड केली आहे.त्यांच्या विश्वासाला तडा दिला जाऊ देणार नाही. यापुढे अन्य पक्षांच्या दावणीला पक्ष बांधू दिला जाणार नाही. ’अशी स्पष्ट भूमिका जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मांडली.
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित केली होती. माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, कोल्हापूर उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, रिमा देशपांडे, शशिकांत बीडकर यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली. इंगवले म्हणाले, शिवसेनेत संजय पवार हे ज्येष्ठ आहेत. त्यांनी मार्गदर्शन करावे, ते स्विकारतो. ते पक्ष नेतृत्वाला भेटायला गेले आहेत, त्यांची नाराजी दूर होईल. कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाचे किमान पंधरा जागा निवडून आणू. या आगामी निवडणुकीसाठी पक्ष बळकट करण्याचे काम केले जाणार आहे. मित्र पक्षांची साथ मिळाली तर हे यश दूर नाही.’
पत्रकार परिषदेत बोलताना इंगवले यांनी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर टीका केली. पालकमंत्र्यांच्या मोटारीतून मटका, जुगारवाले फिरत आहेत असा आरोप केला. शिंदे सेना भविष्यात शिल्लक राहणार नाही. भाजप शिंदे सेनेला गिळकृंत करणार आहे. हर्षल सुर्वे यांच्याकडे शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली होती. त्यांना आणखी काय हवे होते ? पक्ष सोडण्यासाठी त्यांना केवळ निमित्त हवे होते. यामुळे त्यांच्याविषयी काय बोलणार ? असा प्रश्न इंगवले यांनी केला.