Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कोल्हापुरात शनिवारी बैठकउद्धव ठाकरेंची भेट, पण नाराजी कायम ! प्रामाणिकपणाचे फळ म्हणून जिल्हाप्रमुखपदी निवड-रविकिरण इंगवलेसावकार मादनाईक भाजपात दाखल, शिरोळमध्ये भाजपाला मिळाला नवा नेताविद्यापीठातील औद्योगिक रसायनिक शास्त्रमधील विद्यार्थ्यांची निवड आर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डी. टी. शिर्के न्यू वूमन्स फार्मसीचा शंभर टक्के निकालरोहिणीदेवी जयवंतराव घाटगे यांचे निधनडॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशनगुणीदास फाऊंडेशनतर्फे शनिवारी तीर्थ विठ्ठल भक्तीगीत कार्यक्रम

जाहिरात

 

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

schedule02 Jul 25 person by visibility 71 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी (दि. ५ जुलै) सायंकाळी ५.३० वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांचे ‘समाज, माध्यमं आणि संविधानिक मूल्ये’ या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. जत्राटकर यांचे ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक अक्षर दालन प्रकाशनातर्फे प्रकाशित होते आहे, तर ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा ललित लेख संग्रह भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकांचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अनुभवी माध्यमकर्मी डॉ. श्रीरंग गायकवाड आणि राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे हे यावेळी पुस्तकांवर प्रथम भाष्य करणार आहेत. तरी, या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाशक अमेय जोशी आणि भाग्यश्री कासोटे-पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes