राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची कोल्हापुरात शनिवारी बैठक
schedule03 Jul 25 person by visibility 35 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची जिल्हास्तरीय बैठक शनिवारी, पाच जुलै २०२५ रोजी कोल्हापुरात होत आहे. पक्षाचे राज्य निरीक्षक शशिकांत शिंदे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. साईकस एक्स्टेशन येथील श्री महालक्ष्मी सभागृह येथे सकाळी अकरा वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी दिली. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठक आयोजित केली आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत.बैठकीसाठी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण, कोल्हापूर शहर आणि इचलकरंजीचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व सेल अध्यक्ष यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.