Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रंगतोय आयपीएल फॅन पार्क खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांबरोबर बैठकीचे आयोजन: आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुन्हा ताकतीने उभा करणार - शशिकांत शिंदेमहे येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत वरुटे यांचा सत्कार उद्योगमंत्र्यांची पत्नी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत !  निलम शिर्के, वर्षा उसगावकर, सुशांत शेलार, सतीश रणदिवे, आनंद काळेंचे अर्ज, मातब्बर कलाकार निवडणुकीपासून लांबच ! !ज्या शिवाजी विद्यापीठाने मला घडविले, त्या मातृसंस्थेचे ऋण फेडणे हीच मोठी जबाबदारी - डॉ. आर. के. कामतसावित्रीबाई फुले रुग्णालयात डोनेशनमधून वॉटर फिल्टरची सुविधासायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना, गोकुळमध्ये नेदरलँडच्या तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शनरोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरतर्फे शॉपिंग - फूड एक्स्पोमी कृतज्ञ, प्रकुलगुरुपदाच्या कालावधीत खूप काही शिकता आले - डॉ. ज्योती जाधव

जाहिरात

 

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ ! प्रॅक्टिस क्लब, वेताळमाळ तालीम विजयी !!

schedule04 Apr 26 person by visibility 297 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेला शनिवारपासून (चार एप्रिल 2026 ) सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेताळ तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रसादिक वाघाची तालीम मंडळ व प्रॅक्टिस क्लब फुटबॉल संघ विरुद्ध  मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळ या संघात सामना झाला. या सामन्यात वेताळ तालीम मंडळ संघाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ संघावर तीन विरुद्ध शून्य गोल फरकाने विजय मिळवला. या सामन्यात वेताळमाळ तालमीचा खेळाडू आकाश माळी हा सामनावीर ठरला. वेताळमाळ तालीमकडून सर्वेश वाडकर, आकाश माळी, अभिषेक सावंत यांनी गोल केले.
  पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी वाय पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.रम्यान विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण,  महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, गोकुळचे संचालक  बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, नगरसेवक प्रवीण केसरकर,  अर्जुन माने,   अमर समर्थ, संजय मोहिते,  दुर्वास कदम,  प्रतिज्ञा उत्तुरे, स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी, राहुल माने, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, माजी नगरसेवक ईश्वर परमार, रमेश पुरेकर, आपचे संदीप देसाई,  शिक्षक नेते भरत रसाळे, तौफिक मुल्लानी, डॉ भरत कोटकर, पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संदीप सरनाईक, फुटबॉल प्रशिक्षक शरद माळी, संपत जाधव, निवास जाधव बाळासाहेब निचिते,  बाळासाहेब चौगुले, दीपक चोरगे, गणेश विचारे, कमलेश शिंदे,  दिग्विजय मगदूम, तुषार देसाई, सिद्धेश्व हावळ, तुषार घाटगे, विवेक दळवी, अक्षय शेळके, श्रीधर गाडगीळ, शरद माळी, आदी उपस्थित होते. दरम्यान प्रॅक्टिस फुटबॉल क्लब व मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळ यांच्यातील सामना दुपारी झाला. या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने एकतर्फी विजय मिळवला. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब मर्दानी खेळाचा आखाडा तालीम मंडळ या संघावर सात विरुद्ध शून्य गोल फरकाने मोठा विजय मिळवला. प्रॅक्टिस फुटबॉल क्लबकडून अजिंक्य नलावडे ने तीन गोल केले. रोहित भोसलेने दोन गोल केले सागर चिले व साहील डाकवे यांनी प्रत्येकी एक गोल केला. या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा खेळाडू हा सामनावीर ठरला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes