कोल्हापुरात पोलिस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा
schedule26 Jan 26 person by visibility 23 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा समारंभ येथील पोलीस परेड क्रिडांगणावर उत्साहात पार पडला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. समारंभ प्रसंगी प्रथम संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. पहिल्यांदाच पोलीस परेड येथील क्रीडांगणावर हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
पालकमंत्री आबिटकर यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायले गेले. पालकमंत्र्यांनी परेड कमांडर आरांक्षा यादव परिविक्षाधीन भापोसे यांच्यासोबत परेड निरीक्षण झाल्यानंतर विविध विभागांच्या पथकांनी संचलन केले. तसेच यावेळी प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
खासदार शाहू महाराज छत्रपती, जैन अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललीत गांधी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते. मंत्री आबिटकर यांनी नागरिकांना पुष्प देऊन स्वागत केले.
उषाराजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोंधळगीत सादर केले. विविध शाळेतील दोन हजार विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर संगीतमय कवयितमधून उपस्थितांमध्ये राष्ट्रभावना जागृत केली. या समारंभात जिल्हावासीयांना उद्देशून जिल्ह्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी भाषण केले. आबिटकर म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या मातीने देशाला नेहमीच दिशा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 'रयतेचे राज्य' ही संकल्पना मांडली, जी आजच्या लोकशाहीचा मूळ आधार आहे. महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासह अनेक महापुरुषांच्या त्यागातूनच आज आपण ही लोकशाही उपभोगत आहोत. तरुण हे देशाचे भविष्य असून स्वातंत्र्यसैनिकांनी जे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते समृद्ध करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. हुतात्म्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, संविधानातील मूल्ये जपण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याला व देशाला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया,