रंकाळा तलावाच्या संवर्धन-सुशोभीकरणाचा मास्टर प्लॅन-राजेश क्षीरसागर
schedule29 Sep 24 person by visibility 170 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापुर : कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धनसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यासंबंधी मास्टर प्लॅन तयार आहे. नगरविकास विभागाकडून रंकाळा तलाव येथे म्युजीकल फाउंटेन उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पाच कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
रंकाळा तलावाचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी गेल्या तीन वर्षात एकूण २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री व सद्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नगरविकास विभागाकडून मुलभूत सोयीसुविधा अंतर्गत पहिला टप्प्यातील ९ कोटी ८४ लाख निधी मंजूर करण्यात आला या निधीतून कामाची सुरवात करण्यात आली आहे. पर्यटन विभागाकडून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान साकारण्यासाठी ४ कोटी ८० लाख, रंकाळा तलावासभोवती विद्युत रोषणाई करणे यासाठी ३ कोटी ५० लाख, जिल्हा नियोजन समिती मधून मिनिचर पार्क करण्यासाठी २ कोटी ५० लाख आणि सद्यस्थितीत मंजूर झालेला म्युजिकल फाऊटेन उभारण्यासाठी ५ कोटींचा निधी यांचा समावेश आहे.
रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी याठिकाणी परदेशाप्रमाणे म्युजीकल फाउंटेन उभारण्याची संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे मांडली. एकंदरीत रंकाळा तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. सरकारच्या विविध हेडअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. रंकाळ्याचा ऐतिहासिक वारसा जपत विकास कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे रंकाळ्याच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. एकूण सुमारे ४० कोटींचा निधी याकामी आवश्यक आहे. या आराखड्यातील प्रस्ताविक कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.