वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात मोर्चा, भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी
schedule14 Oct 25 person by visibility 13 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लडाखमधील शिक्षण आणि पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारने २६ सप्टेंबरला अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीतर्फे तेरा ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात आला.
दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘नही चलेगी-नही चलेगी, दादागिरी नही चलेगी,’अशा घोषणा देत कार्यकर्ते मोर्चात सहभाग झाले. व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. याठिकाणी कार्यकर्त्यांनी ठिय्या मारत जोरदार घोषणा दिल्या.निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले.
आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे राष्ट्रीय सचिव अशोक ढवळे, शिवसेनेचे सहसंर्पक्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, कॉम्रेड चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम, शिवाजीराव परुळेकर रवी जाधव, शेकापचे बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, डॉ. टी. एस. पाटील, डी. जी. भास्कर, रघुनाथ कांबळे, सुभाष देसाई, अतुल दिघे, विनायक घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी होते.