Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कारकरवीर गर्जनातर्फे गुढीपाडव्यादिवशी शोभायात्राकाँग्रेसने थाटली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल, गॅस दरवाढ –तुटवडावरोधात आंदोलनकोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने  किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम  महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !डिबेंचर्सच्या रकमेबाबत दूध संस्थांना अपेक्षित निर्णय होईल – हसन मुश्रीफकलाकार आहेत म्हणून समाज आहे- प्रकुलगुरू ज्योती जाधव

जाहिरात

 

करवीर गर्जनातर्फे गुढीपाडव्यादिवशी शोभायात्रा

schedule16 Mar 26 person by visibility 18 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर गर्जना ढोल पथकातर्फे गुढीपाडव्यादिवशी, १९ मार्च रोजी शोभायात्रेचे आयोजन केले आहे. या शोभायात्रेत चित्ररथ, रंगाविष्कार दुचाकी पथक, मर्दानी खेळ, लेझीम पथक, मल्लखांब पथक, बालचमू वेशभूषा स्पर्धा, ढोल पथक असणार आहे. सकाळी नऊ  वाजता मिरजकर तिकटी येथून शोभायात्रेला प्रारंभ होईल. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, ते छत्रपती शिवाजी चौक अशी शोभायात्रा निघणार आहे. ‘यंदा आपली माती, आपले खेळ’या संकल्पनेवर आधारित चित्ररथ आहेत.युवराज संभाजीराज छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांच्या उपस्थितीत शोभायात्रेला प्रारंभ होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. याप्रसंगी पथकाचे अध्यक्ष निखिल गावडे, उपाध्यक्ष युवराज जोशी, आशय बागल, विवेक माळी, श्रेया जोशी, निशांत जाधव, अजिंक्य शिंदे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes