Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंती

schedule16 Mar 26 person by visibility 180 categoryशैक्षणिकक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारणा विद्यापीठ, वारणानगर अंतर्गत असलेल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे रांगणा किल्ल्यावर पदभ्रमंतीचे आयोजन केले होते. या पदभ्रमंतीत एनसीसी छात्र सैनिकांनी सुमारे २७ किलोमीटर अंतर पार केले. ही पदभ्रमंती असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. रणजीत नाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. गाईड संदीप देसाई यांनी किल्ल्याचा इतिहास व गडावरील ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली.

या उपक्रमासाठी वारणा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व आमदार  विनय कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांचे प्रोत्साहन लाभले. प्राचार्य डॉ. डी. एन. माने व अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांचे सहकार्य लाभले.या पदभ्रमंतीसाठी एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर इंद्रजीत कोळपे, ज्युनिअर अंडर ऑफिसर अवधूत साळुंखे, वीरसेन चिकने, सार्जंट रूपम मोकाशी, कार्पोरल विश्वजीत कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. छात्र सैनिकांच्या सोबत डॉ. अमोल पाटील, प्रा. बाळकृष्ण पोतदार, प्रा संभाजी शेळके, सुरज खोत, विजय चौगुले यांनी सहभाग नोंदवला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes