जितो कोल्हापूर चॅप्टरतर्फे पुरस्कार वितरण
schedule28 Sep 24 person by visibility 193 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जितो कोल्हापूर चॅप्टरचा स्नेहमेळावा व पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात झाला. हॉटेल सयाजी येथे हा कार्यक्रम झाला. २०० हून अधिक सभासद उपस्थित होते.
चॅप्टरचे मुख्य सचिव अनिल पाटील यांनी मागील दोन वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. या समारंभात जितो लाईफ टाईम अवार्ड जसवंत शहा यांना तर जितो सोशल अवॉर्ड हा इचलकरंजी येथील व्यावसायिक रवींद्र देवमोरे यांना देण्यात आला. जितो बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड हा प्रकाश राठोड यांना, जितो यूथ एंटरप्रनर अवार्ड तरुण उद्योजक आशीष देसाई यांना देण्यात आला. आहे.
स्वागत गिरीश शहा यांनी केले. लेडीज विंग अध्यक्ष श्रेया गांधी यांनी लेडीज विंगचे कार्यक्रम आणि यूथ विंगचे चेअरमन चिंतन राठोड यांनी यूथ विंगच्या कार्याचा आढावा घेतला. जेएटीएफमार्फत यशस्वी झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जितेंद्र राठोड यांनी कोल्हापूर चॅप्टरने केलेल्या कार्याचे कौतुक केले. नवीन कार्यकालासाठी अध्यक्ष म्हणून निवड झालेले रवी संघवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जीतो श्रमणआरोग्य ट्रस्टी अरुण ललवाणी यांचा सत्कार केला. यावेळी रमण संघवी, शीतल कोरडे, शेखर आडके, राजीव पारीख, शीतल गांधी, जय कुमार पारीख, युवराज ओसवाल, चंद्रकांत ओसवाल, संदीप पटणी, अमृत पारिख उपस्थित होते.