शिक्षण प्रसारक मंडळच्या प्रशासनाधिकारीपदी पृथ्वी मोरे
schedule05 Jun 24 person by visibility 585 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरातील नामांकित शिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर या संस्थेच्या प्रशासन अधिकारीपदी पृथ्वी अजितराव मोरे यांची निवड झाली. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी अजितराव मोरे, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलतराव देसाई, माजी नगरसेवक अजितराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कौन्सिल सदस्य प्रा. पी. बी. झावरे, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य एन. टी. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. मोरे, तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.