विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, बारामतीत विमान कोसळले
schedule28 Jan 26 person by visibility 63 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये बुधवारी 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी मृत्यू झाला. बारामती येथे विमान लँडिंगवेळी हा अपघात घडला. यामध्ये पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी पवार यांची बुधवारी सकाळी 11 वाजता बारामती परिसरात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी ते सकाळी मुंबईहून विमानाने निघाले. बारामती जवळ विमान लँडिंग होत असताना वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले. खराब हवामान व तांत्रिक बिघाड यामुळे विमान कोसळले. विमान कोसळताच पेट घेतला यामध्ये विमानातील सर्वजण मृत्यूमुखी पडले, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते होते. त्यांनी तीन वेळेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषविले. अर्थमंत्री पदासह विविध खाती सांभाळली. राज्याच्या राजकारणातील तडफदार नेता अशी त्यांची ख्याती होती. दरम्यान अपघाताचे वृत्त समजतात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार हे नवी दिल्लीहून बारामतीकडे निघाले आहेत. अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.