Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिका निवडणूक - राजकारणातून मला बदनाम करण्याचा घाट - सुशांत पोवारसचिन शिरगावकर यांना उद्योगरत्न पुरस्कार, डॉ. आनंद देशपांडेंच्या हस्ते गुरुवारी वितरण समारंभकोल्हापूर जिल्हा बहुजन शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नंदकुमार कांबळे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिपुगडेअंबाबाई मंदिर आराखड्यातील भूसंपादनासाठी योग्य मोबदला मिळणार; कोणावरही अन्याय होणार नाहीसहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्र   शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्या कामकाजाच्या चौकशीचा अहवाल सीईओंकडे सादर, ३८ पानी अहवालप्राथमिक शिक्षणाधिकारीपदी अशोक घुगे रुजूगोकुळचा दूध वाढ गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम, गावनिहाय पाच वर्षाचे मायक्रो प्लॅनिंगरग्गेडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा कुलगुरू राजनीश कामत  यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार

जाहिरात

 

महापालिका निवडणूक - राजकारणातून मला बदनाम करण्याचा घाट - सुशांत पोवार

schedule18 Aug 26 person by visibility 32 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहर अंतर्गत धोकादायक वृक्ष व फांद्या तोडप्रकरणी राजकीय कारणातून मला बदनाम करण्याचा घाट घातला जात आहे प्रभाग क्रमांक 12 मधून मी निवडणूक लढू इच्छित होतो. त्याचा राग काहीजणांनी मनात धरून माझ्या विरोधात बदनामी सुरू केले आहे .' असे मत निरमा कंस्ट्रक्शनचे कोल्हापुरातील प्रतिनिधी सुशांत पोवार यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादीचे नगरसेवक आदिल फरास यांनी निवडणूक लढवली होती असेही त्यांनी सांगितले

महापालिका अंतर्गत शहरातील वृक्ष धोकादायक वृक्ष व फांद्यातून करिता निर्माण कन्स्ट्रक्शन ला ठेका दिला आहे मात्र निर्माण कन्स्ट्रक्शन चे काम समाधानकारक नसल्यामुळे ब्लॅकलिस्ट करावे आणि शहरातील संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांनी महापालिका सभेत केली होती. तसेच तोडल्या झाडांच्या चोरी झाले हे त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला होता. स्थायी समिती सभेमध्ये ठेकेदार निरमा कन्स्ट्रक्शन ला ब्लॅकलिस्ट करण्याचा मागणीही त्यांनी केली होती. महापालिकेच्या अधिकाऱ्याने त्यासंबंधीची नोटीस निर्माण कंस्ट्रक्शनचे कोल्हापुरातील प्रतिनिधी सुशांत पोवार यांना दिली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर पवार आणि मंगळवारी पत्रकारांशी बोलताना निरमा कन्स्ट्रक्शनचा मी मालक नाही. मी कोल्हापुरातील त्यांचा प्रतिनिधी आहे. निरमा कन्स्ट्रक्शन मुंबईतील कंपनी आहे. ओमप्रकाश बिश्नोई  हे या कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत. विभागीय कार्यालय क्रमांक एक व विभागीय कार्यालय क्रमांक चार अंतर्गत धोकादायक वर्ष फांद्या तोडीचा ठेका निरमा कंस्ट्रक्शनकडे आहे. विभागीय कार्यालय क्रमांक एक व विभागीय कार्यालय क्रमांक चार मधील अंतर जास्त असल्यामुळे एकाच कंस्ट्रक्शनकडे या दोन्ही कार्यालय अंतर्गत वृक्षतोडीचे काम  का दिले गेले हा मला प्रश्न पडतो. आमच्याकडे मनुष्यबळ अपुरे आहे, बूमची संख्या कमी आहे त्यामुळे पावसामुळे पडलेल्या फांद्या उचलण्यात  दिरंगाई  झाली. मात्र तोडलेल्या फांद्या व झाडांची चोरी या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही नाहीज्यांनी चोरी केले आहे त्यांचा ट्रॅक्टर पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे मात्र या साऱ्या प्रकरणात विनाकारण माझी बदनामी सुरू आहे. त्याला राजकीय वास आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून मी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होतो मात्र आरक्षणमुळे माझी पत्नी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होती. आम्ही निवडणूक लढवली म्हणून काहीना राग आला असेल म्हणून ते माझी बदनामी करत आहेत.' असे पोवार यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes