महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “ मुलांचा बौधिक विकास होणेसाठी सहा महिने बाळाला आईचे स्तनपान आवश्यक आहे.,’ असे मत कुटुंब कल्याण प्रशिक्षक केंद्राचे प्राचार्य डॉ. योगेश साळे यांनी व्यक्त केले.
केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार जागतिक स्तनपान सप्ताह १ ते ७ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर आरोग्य विभागमार्फत साजरा होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तीकेयन व प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.
डॉ. फारुख देसाई यांनी स्तनपानाच्या पध्दती सुधारण्यासाठी स्तानदा मातांना सुरक्षित वातावरण निर्माती करणे, बालमृत्यु कमी करणे, पोषण सुधारणा आणि बालपणीच्या प्रारंभिक विकासा मध्ये निव्वळ स्तनपानाच्या भूमिकेवर भर देण्यासाठी जनजागृती समाजात निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. या वर्षी "आई आणि बाळामधील अंतर कमी करु या स्तनपानाला समर्थन देऊ या" ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी आभार मानले.
..........................
समाजामध्ये जनजागृती आवश्यक
राज्यातील सर्व प्रसुती केंद्रामध्ये जन्मानंतर १ तासाच्या आत बाळाला स्तनपान देणे आणि मातांना स्तनपानासाठी पुरेसा पाठिंबा देण्याकरीता राज्यातील सर्व प्रसुती केंद्रांवर लक्ष केंद्रीत करावयाचे आहे. त्यासाठी सार्वजनिक ठीकणावरील सर्व हिरकणी कक्ष कार्यरत ठेवणे तसेच समुदाय व संस्था स्तरावर कार्य करणा-या आरोगय सेवा प्रदात्यांमार्फत बाळाला पहिले ६ महिने निव्वळ स्तनपान व त्याचे महत्व आणि ६ महिन्यानंतर ते २ वर्षे वया पर्यंत किंवा त्यानंतरही पुरक आहारासोबत स्तनपान सुरु ठेवणे विषयी समाजामध्ये जनजागृती आवश्यक आहे.