Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्ट्रक्चरल इंजिनियर्सतर्फे शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर, काँग्रेसकडून निवडीसंबंधी महापौरांना पत्रकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसमृद्ध शाळा - समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यासाठी आदर्शवत, जिल्हा नियोजन समितीत गौरवोद्गगारकोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळ – संध्याकाळच्या सत्रात विमानसेवा, दोन मार्चपासून प्रारंभमेन राजारामच्या विद्यार्थिनींनी जिंकली राज्यस्तरीय स्पर्धा ! पालकमंत्र्यांनी केले कौतुक, जिल्हा प्रशासनाने दिले बक्षीस!!शाहू मिलच्या डेव्हलपमेंटसंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक - पालकमंत्री प्रकाश अबिटकर सार्थक क्रिएशन्सच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रम, मान्यवरांचा सन्मान होणारअंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने, अन्यथा  गुरुवारपासून कामबंद आंदोलनकाँग्रेसचे तीन धुरंधर… जनमानसात पक्षाचा हात बळकट करणारे शिलेदार

जाहिरात

 

मेन राजारामच्या विद्यार्थिनींनी जिंकली राज्यस्तरीय स्पर्धा ! पालकमंत्र्यांनी केले कौतुक, जिल्हा प्रशासनाने दिले बक्षीस!!

schedule11 Feb 26 person by visibility 36 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथील  विद्यार्थिनींनी नाशिक येथे पार पडलेल्या १९ वर्षाखालील राज्यस्तरीय खो- खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत कोल्हापूरच्या क्रीडा नगरीचा नावलौकिक वाढविला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या विद्यार्थिनींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. तसेच यापुढे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याची ग्वाही दिली. ग्रामीण भागात फाटके बूट घालून खो - खो चा सराव करणाऱ्या या विद्यार्थ्यांची ही परिस्थिती पाहून जिल्हा प्रशासनाने सीएसआर निधीतून या बारा विद्यार्थ्यांना नामवंत कंपनीचे स्पोर्ट शूज भेट दिले.

नाशिक येथे राज्यस्तरीय पार पडलेल्या खो-खो क्रीडा स्पर्धेत मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला.यातील सानिका चाफे, श्रावणी पाटील व अमृता पाटील या तीन खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. मध्यप्रदेशातील जबलपूर या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पार पडलेल्या या छोटेखानी समारंभात पालकमंत्री  आबिटकर यांच्या हस्ते या संघातील १२ खेळाडूंनाना नामवंत कंपनीचे स्पोर्ट शूज भेट दिले. या मुलींच्या संघातील खेळाडूंना प्रत्येकी दोन ट्रॅक सूट किट हे भेट स्वरूपात देणार असल्याची घोषणा आमदार अमल महाडिक यांनी केली.

राज्यस्तरीय स्पर्धा जिंकणाऱ्या या खेळाडूमध्ये अनुष्का धोंडीराम पाटील, सलोनी गणपत जामदार, सानिका श्रावण चाफे, संगीता जानू फाले, श्रावणी लक्ष्मण पाटील, श्रावणी दिपक पाटील, वैष्णवी संजय पाटील, दिक्षा  राजगोंडा पाटील, आशाराणी शरद पोवार, अर्चना बाबासो माने, अमृता बाबासो पाटील, सिद्धी सुरेश माने यांचा समावेश आहे. दरम्यान मध्यप्रदेशातील जबलपूर या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत सानिका चाफे, श्रावणी दिपक पाटील, अमृता बाबासो पाटील यांची निवड झाली होती. दुसरीकडे सानिका चाफे ही महाराष्ट्र संघाची कर्णधार होती. तर राज्यस्तरावर अमृता पाटील ही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.या खेळाडूंना प्रशिक्षक भीमराव भादिंगरे यांनी मार्गदर्शन केले.

या खेळाडूंच्या सत्कारावेळी  जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकीयेन , क्रीडा उपसंचालक सुहास पाटील , माध्यमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, क्रीडा अधिकारी विद्या शिरस,मेन राजाराम हायस्कूल व ज्यु.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . गजानन खाडे आदी उपस्थित होते.

……………

जिल्हा परिषदेने केली निवास व भोजण्याची व्यवस्था

मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये या खो खो संघातील मुली या ग्रामीण भागातील आहेत.  या खो खो संघाची राज्यस्तरावर निवड झाल्यानंतर त्यांच्या सरावात व शिक्षणात खंड पडू नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने या साऱ्या मुलींच्या निवासाची सोय शिंगणापूर येथील निवासी शाळेतील होस्टेलमध्ये केली. तसेच भोजनाची सोय केली. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर  यांनी विशेष लक्ष घालून या मुलींच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes