शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रम
schedule27 Dec 25 person by visibility 29 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ नैसर्गिक शेती ही केवळ शेती करण्याची पद्धत नसून ती मानवाच्या आरोग्याशी आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेशी जोडलेली एक जीवनशैली आहे.रासायनिक खतं व जीवघेणे कीटकनाशके मातीची सुपीकता नष्ट करतात आणि अन्नाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम घडवतात. दुसरीकडे नैसर्गिक शेती जैवविविधतेचे जतन करून निरोगी, पौष्टिक आणि विषमुक्त अन्न निर्माण करते. ’असे मत केंद्रातील कृषी विपणन विभागात संचालक व कृषी अर्थतज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केले.
राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात केले. नैसर्गिक शेती मिशनचा पहिला कार्यक्रम झाला. उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय विशेषतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी डॉ. पाटील म्हणाले, ‘ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर मातीशी नाळ असलेले भूमिपुत्र राज्य आणि देश स्तरावरील धोरण निर्मितीमध्ये सहभागी पाहिजेत. या दृष्टीने महाविद्यालयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींनी कॉर्पोरेट जगतात प्रवेश करा मोठ्या कंपन्यांमध्ये करिअर घडवा, पण आपल्या मातीशी असलेलं नातं हरवू देऊ नका. कुटुंबाच्या परंपरा आणि शेतीची मूल्यं जपण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. माती अभिमानाची आहे, तिला कमीपणा मानण्याची मानसिकता बदलली पाहिजे.
यावेळी शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन ,शरद सहकारी सूतगिरण आकुर्डेचे उपाध्यक्ष अशोक फराकटे, असीमा मॅगझिन गोवाचे बिझनेस हेड चंद्रकांत पाटील सुळंबीकर, शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक म्हणून प्रा.विशालसिंह कांबळे यांनी भूमिका पार पाडली. प्रा. साक्षी गुरव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रतिज्ञा कांबळे यांनी आभार मानले. केले. यावेळी उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा.दिग्विजय कुंभार, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, शेतकरी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.