मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह भाजप नेत्यांच्यासोबत चर्चा ! दोन दिवसापूर्वी निवडणूक लढविण्याचा निर्णय ! !
schedule26 Dec 25 person by visibility 49 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :यूथ आयकॉन म्हणून सर्वपरिचित असलेल्या कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महापालिका निवडणूक लढविणार आहेत. यासंदर्भात त्यांनी अधिकृत माहिती दिली. ते म्हणाले, ‘कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी दोनच दिवसापूर्वी माझा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली’असे त्यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
शुक्रवारी, कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी महापालिका निवडणूक, महायुतीचा जाहीरनामा, निवडणूक लढविण्यामागील भूमिका यासंबंधी सविस्तरपणे भूमिका मांडली. ‘माझं सामाजिक कार्य मोठा आहे मी कोल्हापूरच नव्हे तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये माझ्या वैयक्तिक सामाजिक कार्यातून पोहोचत आहे. मला काम करण्याची संधी मिळावी यासाठी दीड वर्ष झालं कार्यरत आहे.पुढे जात असताना कुठल्याही पदाचा विचार न करता मी ही निवडणूक लढवत आहे. नुसतं वार्डचा विचार करणार नाही तर शहराचा विचार करणार आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढील पंधरा दिवस मी उतरणार आहे.’असे त्यांनी सांगितले.
कृष्णराज महाडिक हे प्रभाग क्रमांक तीनमधून लढणार आहेत. याबद्दल ते म्हणाले,‘ महापालिकेचे कामकाज कसं होते, हे देखील मी पाहिलेले नाही. यामुळे महापालिका निवडणुकीचा अनुभव हा वेगळा असेल. मला खूप शिकायला मिळणार आहे. अनुभवी लोकांच्या बरोबर मला या निवडणुकीत काम करायला मिळेल. माझा जाहीरनामा लवकरच जाहीर प्रसिद्ध केला जाईल आणि तो सविस्तर असेल. महापालिका निवडणुकीत वेगळे मुद्दे घेऊन मी उतरणार आहे. माझं काम चांगलं आहे. लोकांच्या माझ्यावर विश्वास आहे .’असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर महापालिकेत महायुतीचा फॉर्म्युला काय या प्रश्नावर ते म्हणाले, ’महापालिका निवडणुकीसाठी कोल्हापूमध्ये महायुतीचा फॉर्मुला अद्याप ठरलेला नसला तरी आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहे. येत्या दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये येण्याची गेल्या अनेक वर्षांपासून इच्छा आहे. संविधानाच्या पदासाठी पहिली पायरी ही महापालिका निवडणुकीची असते.मला माझ्या राजकीय गुरूंनी पाठीशी आहेत. विधानसभेवेळी कोल्हापूर उत्तर मधून मी तयारी करत होतो. त्यावेळी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा प्रचारही मी केला. योग्य वेळी राजकारणात आलो आहे त्यामुळे मी समाधानी आहे.’