समतेच्या इतिहासात माणगावचे स्थान अजरामर, आंबेडकरांच्या स्मारकाला राष्ट्रीय दर्जासाठी प्रयत्नशील - मंत्री हसन मुश्रीफ
schedule25 Apr 25 person by visibility 27 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘माणगावची भूमी क्रांतीची भूमी आहे. येथील दलित बांधवांनी १९२० मध्ये राजर्षी छञपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अस्पृश्य परिषद घेतली होती. त्यामुळे देशात समतेचा इतिहास लिहिताना माणगावाच्या योगदानाचा उल्लेख होईल. समतेच्या इतिहासात माणगाव गावाचे स्थान अजरामर राहील, असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. समतेचा वारसा जपणाऱ्या माणगाव येथील लंडन हाऊस या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन हा देण्याचा विषय मार्गी लावू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पन्हाळा, कोल्हापूर, माणगाव, जयसिंगपूर अशा :गौरवशाली महाराष्ट्र -मंगल कलश यात्रे" दरम्यान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मंत्री मुश्रीफ माणगाव येथे आले होते. सरपंच राजू मगदूम यांनी मंत्री मुश्रीफ यांचे स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हातकणंगले तालुकाध्यक्ष संभाजीराव पोवार यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, राष्ट्रवादीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास, गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले, अमित गाताडे, आसिफ फरास, महिला आघाडीच्या शीतल फराकटे, जहिदा मुजावर आदी उपस्थित होते. पन्हाळा येथून सकाळी मंगल कलश रथयात्रेला प्रारंभ झाला. यामध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा मोठा सहभाग होता.
बाबासाहेबांचा मुलमंञ जपा.....!
नोकरी मागणारे नव्हे तर नोकऱ्या देणारे व्हा... राज्यकर्ते व्हा...शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश देवून दलित समाजाला स्वावलंबी बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला प्रेरणा दिली. त्यांचा हा मूलमंञ कायमपणाने जपा, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले.