राष्ट्रवादीतर्फे पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने, शिवाजी चौकात आंदोलन
schedule24 Apr 25 person by visibility 51 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फें निषेध करण्यात आला. शिवाजी चौक येथे पाकिस्तानच्या निषेधार्थ निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विरोधी घोषणा दिल्या. तर हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना आदरांजली वाहण्यात आली.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले, " काश्मीरमध्ये पर्यटकांची वर्दळ सुरु झाली, आहे. स्थानिक लोकांना काम व मिळकत चालू झाली आहे. सरकारने चांगला कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे आतंकवादी कारवायांना आळा बसला आहे.परंतु या घटनेने परत पर्यटकांची वर्दळ थांबणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा कडक बंदोबस्त केला पाहिजे, जेणेकरून अशा घटना परत घडू नये, काश्मीरमधील दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजे "
याप्रसंगी माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, तात्या खेडकर, प्रकाश कुंभार,रेखा आवळे, विश्वास आयरेकर, सुनील गाताडे,महेंद्र चव्हाण, जहिदा मुजावर, पूजा साळोखे, शितल तिवडे, रामेश्वर पत्तकी, युवराज साळोखे, अच्युतराव साळोखे,दिलीप टोणपे, सचीन आठल्ये,सुमन वाडेकर, सायली भोसले, शोभना खामकर, स्वाती काळे, संध्या भोसले, बजरंग देवकर, जहांगीर अत्तार,पप्पू पांढरे, बी. के भास्कर, सचिन लोहार, साहिल महात, सोनाली कालबिंदे, पद्मजा रसाळ, आईशा खान,ज्योती चव्हाण, स्वाती काळे, संध्या भोसले, शुभांगी वायदंडे उपस्थित होते
.