जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
schedule01 May 24 person by visibility 998 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने एक मे हा महाराष्ट् दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्यालयाच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपस्थितानी राष्ट्रगीत व राज्यगीत गायन केले. त्यानंतर मतदाता शपथ घेतली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपण व आपल्या कुटुंबाने लोकशाही बळकट करणेसाठी मतदाता शपथ घ्यावी व निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने , प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई , उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे , पाणी व स्वच्छता विभाग प्रकल्प संचालक माधुरी परीट, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सागांवकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता वैजनाथ कराड, महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर , जिल्हा कृषि अधिकारी तानाजी पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, मुख्य लेखा व वित्त् अधिकारी अरुणा हसबे उपस्थित होते.
जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा
schedule01 May 23 person by visibility 1159 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांचे हस्ते ध्वजारोहण झाले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद कलामंचच्या वतीने राज्यगीत सादर करणेत आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने , प्रकल्प संचालक सुषमा देसाई , सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई , ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव , मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही.टी. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) सचिन सांगावकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे , माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुणा हसबे व सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.