Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज डडकरुन दाखविलं…केएमटीला मिळतोय नवा चेहरा, सेवेचा परिघ विस्तारणार! रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही कायमची शाश्वती !! २७ कोटीचा घरफाळा थकीत, महापालिकेकडून स्टार बझारची इमारत सील ! सर्कीट बेंचकडून कारवाईला स्थगिती ! !महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ, लक्ष्मीपुरीत साकारले कलापुरीचे कलादालनतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर रंगकर्मी - कलाकारांचा बहिष्कार, दौऱ्यात काळे झेंडे दाखविणारएक दिवसाआड नको,  दररोज पाणीपुरवठा करा - शिवसेना नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी [अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विद्यापीठात एकदिवसीय चर्चासत्रनाट्यगृहाच्या आगीच्या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करा - काँग्रेसच्या नगरसेवकांची एसपींच्याकडे मागणीकेशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, चांगल्या सुविधांसाठी व्यवस्थापनचे आऊट सोर्सिंगकोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी -  रविवारी मार्गदर्शन कार्यक्रम

जाहिरात

 

करुन दाखविलं…केएमटीला मिळतोय नवा चेहरा, सेवेचा परिघ विस्तारणार! रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही कायमची शाश्वती !!

schedule01 Aug 26 person by visibility 22 categoryमहानगरपालिका

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : महापालिकेची परिवहन सेवा म्हणजे सर्वसामान्यांचा आधारवड. रोज लाखो प्रवासी केएमटीतून प्रवास करतात. आसपासची गावे, उपनगरांना कोल्हापूरशी जोडणारी ही सेवा. आपसूकच कोल्हापूरच्या सार्वजिनक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणजे केएमटी असे समीकरण बनले. मात्र वाढती प्रवाशी संख्या, अपुरे बसेस, वाहक - चालकांची कमतरता अशा समस्यांचे चक्रही केएमटीभोवत सतत फिरत असते. मात् प्रवाशी सेवेत कधी खंड पडला नाही. केएमटी आणखी बळकट करण्यासाठी, प्रवाशांना जादा सुविधा देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पावले टाकली. खासदार धनंजय महाडिक यांनी पीएम ई बसेस कोल्हापूरला मिळाव्यात यासाठी मांडलेला प्रस्ताव, बस मंजुरीसाठी दिल्ली दरबारी सातत्याने केलेले प्रयत्न,  केएमटीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्य सरकारकडे केलेला पाठपुरावा आणि परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव यांनी नवीन ई बसेस लवकर केएमटीच्या ताफ्यात लवकर दाखल व्हाव्यात, त्यासाठी वर्कशॉपमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीसाठी केलेले नियोजन या साऱ्यांचे फलित म्हणजे केएमटीला नवा चेहरा लाभत आहे. येत्या दोन दोन महिन्यात शंभर ई बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे सेवेचा परिघही विस्तारणार आहे.

 केएमटीची बस सेवा सध्या कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांसाठी आहे. नवीन बसेस प्राप्त झाल्यानंतर इंटरसिटी केएमटी बस सेवा ही संकल्पना आकार घेईल.शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठीही केएमटीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ऐतिहासिक पन्हाळा, धार्मिक स्थळ जोतिबा, तसेच आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिर अशा प्रमुख पर्यटन व श्रद्धास्थानांसाठी नवीन बसमार्ग सुरू करण्याचा विचार सुरू असून, भाविक आणि पर्यटकांना सुरक्षित, परवडणारी व नियमित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे. नवीन बसेस या नऊ आणि बारा मीटर लांबीच्या आहेत. शहरालगतच्या गावांना केएमटीच्या सेवेशी जोडून विद्यार्थी, कामगार, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

 आधुनिक तंत्रज्ञान, वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवासामुळे नागरिकांचा सार्वजनिक वाहतुकीवरील विश्वास आणखी दृढ होणार आहे. शहरासह ग्रामीण भाग, औद्योगिक क्षेत्रे आणि पर्यटनस्थळांना प्रभावीपणे जोडली जातील.  केएमटीच्या ताफ्यात नव्या बसेस आल्यामुळे केएमटीची सेवा केवळ शहरापुरती मर्यादित न राहता ती सर्वसामान्य नागरिकांच्या गरजेनुसार अधिक व्यापक होणार. केएमटी व्यवस्थापनलाही शहरातील विद्यमान मार्गांचे पुनर्रचना करावी  लागणार आहे. प्रवाशांची संख्या, मागणी आणि वेळेचा अभ्यास होऊन ज्या मार्गांवर नागरिकांची मोठी गर्दी असते त्या ठिकाणी बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ होईल. त्यामुळे नागरिकांचा प्रतीक्षाकाळ कमी होईल आणि प्रवास अधिक जलद व सुलभ होईल. कोल्हापूरकरांना आधुनिक, गतिमान, सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली तर ते शहराच्या हिताचे ठरेल.

………………………..

देखणे विमानतळ, सुशोभित रेल्वेस्थानक आता ई बसेस

खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये दळणवळणाच्या सुविधा अधिक भक्कम करताना कोल्हापूरला देशातील प्रमुख शहरासोबत हवाई कनेक्टिव्हिटीने जोडण्याचा प्रयत्न केला. केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा व निधी उपलब्ध करुन कोल्हापूरच्या विमानतळाला आधुनिक रुप दिले. विमानसेवा सुरू केल्या. विमानतळाची देखणी वास्तू उभारली. रेल्वे स्थानकही सुविधांन सज्ज होत आहे. त्या पाठोपाठ खासदार महाडिक यांनी केएमटीला नव्या ई बसेस उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला. आता नव्या ई बसेस दाखल होत असल्यामुळे तो संकल्पही मार्गी लागत आहे.

………………

रोजंदारी बनले कायमआमदार क्षीरसागरांचा व्यापक दृष्टीकोन

राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात विविध प्रकल्पांना चालना देण्याचे काम आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. त्याचवेळी त्यांनी महापालिकेची राज्य सरकारशी निगडीत कामांची सोडवणूकही केली. रोजंदारी कर्मचाऱ्यांचा कायम सेवेतचा प्रश्न अनेक वर्षे प्रलिंबत होता. वीस, पंचवीस वर्षे सेवा करुनही रोजंदारीचा शिक्का काही पुसला जात नव्हता. आमदार क्षीरसागर यांनी निवडणुकीपूर्वी ५०० कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करण्यात मोलाची कामगिरी बजावली. आता त्यांनी केएमटीकडील रोजंदारी कर्मचाऱ्यांचाही कायम सेवेत करण्याचा विषय सोडविला.

…………………

केएमटीची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी जाधव प्रयत्नशील

परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव यांच्या कुटुंबाला समाजकारण व राजकारणाचाा वारसा लाभलेला. तोच वारसा ते पुढे चालवित आहेत. परिवहन समिती सभापती म्हणून केएमटीला नवा चेहरा देत आहेत. स्वत कारखानदार असल्यामुळे तांत्रिक बाबींची त्यांना पूर्ण माहिती आहे. नव्या ई बसेससाठी त्यांनीही पाठपुरावा केला शिवाय वर्कशॉपमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीवर लक्ष ठेवून कामे करुन घेत आहेत. ‘केएमटीच्या माध्यमातून कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी नवीन मार्ग सुरू करण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल एमआयडीसीकडे जाणाऱ्या बसमार्गांचा विस्तार करण्यात येणार असून, कामगार, कर्मचारी आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित नागरिकांना वेळेवर व नियमित बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन’यासाठी जाधव प्रयत्नशील आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes