Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
२७ कोटीचा घरफाळा थकीत, महापालिकेकडून स्टार बझारची इमारत सील ! सर्कीट बेंचकडून कारवाईला स्थगिती ! !महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ, लक्ष्मीपुरीत साकारले कलापुरीचे कलादालनतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर रंगकर्मी - कलाकारांचा बहिष्कार, दौऱ्यात काळे झेंडे दाखविणारएक दिवसाआड नको,  दररोज पाणीपुरवठा करा - शिवसेना नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी [अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी विद्यापीठात एकदिवसीय चर्चासत्रनाट्यगृहाच्या आगीच्या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करा - काँग्रेसच्या नगरसेवकांची एसपींच्याकडे मागणीकेशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण नाही, चांगल्या सुविधांसाठी व्यवस्थापनचे आऊट सोर्सिंगकोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी -  रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमजिप प्रशासनाची कारवाई, विस्तार अधिकारी- कनिष्ठ सहाय्यक निलंबितस्थायीच्या सभेत आरोग्य विभागाच्या संथगतीच्या कामकाजाचा पंचनामा, विन्सोल कंपनी ब्लॅकलिस्ट

जाहिरात

 

२७ कोटीचा घरफाळा थकीत, महापालिकेकडून स्टार बझारची इमारत सील ! सर्कीट बेंचकडून कारवाईला स्थगिती ! !

schedule31 Jul 26 person by visibility 30 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाने घरफाळ्याच्या तब्बल २७ कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणी घाटगे पाटील ऑटोमोबाईल्सच्या मिळकतीतील स्टार बझारची इमारत शुक्रवारी दुपारी सील केली. मात्र, सायंकाळी कोल्हापूर सर्किट बेंचकडून सील न करण्याबाबत स्थगिती आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने पुढील कारवाई थांबवून इमारतीवरील सील काढले.  महापालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाकडून थकीत घरफाळा वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली. संबंधित मिळकतीवर सुमारे २७ कोटी रुपयांची घरफाळा थकबाकी असल्याने दुपारी सीलची कारवाई करण्यात आली होती. यानंतर संबंधित मिळकतधारकांनी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता कोल्हापूर सर्किट बेंचकडील स्थगिती आदेश कारवाईच्या ठिकाणी सादर केला. न्यायालयाच्या आदेशाची दखल घेत महापालिकेने पुढील कारवाई तात्पुरती स्थगित केली तसेच लावण्यात आलेले सील काढण्यात आले. ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार व उपआयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त विजय पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes