Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रचाराचा संडे, प्रभाग सातमधील महायुतीच्या प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसादसावळाच रंग तुझाने रसिक मंत्रमुग्ध ! वंदना गुप्तेंच्या भेटीने प्रेक्षक सुखावले!प्रभागातील विकासकामे तुमच्यामुळेच, आम्ही तुमच्यासोबत- उमा बनछोडेंना मिळतोय मतदारांचा पाठिंबा गोकुळची ऐतिहासिक कामगिरी, साकारले प्रतिदिन वीस लाख लिटर दूध संकलन ! सासऱ्यांच्या प्रचारार्थ सूनबाई आघाडीवर, नाईनकवरे कुटुंबीयांचे नातं प्रत्येक घराशी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या सराव परीक्षेचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त - मीना शेंडकरश्रीकांत जाधव यांना रंगबहार जीवनगौरव पुरस्कार, अठरा जानेवारीला मैफल रंगसुरांची प्रभागाने माझ्यावर प्रेम केलं…मुलांलाही पाठिंबा मिळतोय ! लोकसेवेची जाधव कुटुंबीयांची परंपरा !!महायुतीचे उमेदवार हे कार्यसम्राट, महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसत्यजीत जाधवांची प्रभाग विकासाची अष्टसूत्री संकल्पना, मतदारांना वाटतेय आपलीशी !

जाहिरात

 

लोकराजा चित्र-शिल्प प्रदर्शन २६ जूनपासून

schedule25 Jun 24 person by visibility 559 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती यांंच्या १५० व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील चित्रकार व शिल्पकार यांचे लोकराजा चित्र शिल्प प्रदर्शन श्री शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आले आहे. २६ ते २८ जून २०२४ या कालावधीत प्रदर्शन खुले असणार आहे. 
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते बुधवारी, २६  जून रोजी दुपारी बारा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन आहे. कलेचा उद्धारक आणि आश्रयदाता असणाऱ्या लोकराजा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोल्हापुरातील लहान थोर अशा २६ कलाकारांनी एकत्र येऊन ही अनोखी मानवंदना देण्याचे ठरवले आहे. राजर्षी शाहूंच्या विविध पैलूंचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन आहे. 
प्रदर्शनामध्ये  विलास बकरे, अजय दळवी,विजय टिपुगडे, प्रशांत जाधव, शिवाजी मस्के,अरुण सुतार, राहुल रेपे, मनोज दरेकर,मंगेश शिंदे, बबन माने, नागेश हंकारे, संतोष पोवार, सुनील पंडित, मनीपद्म हर्षवर्धन, गजेंद्र वाघमारे,विवेक कवाळे, विजय उपाध्ये, शैलेश राऊत, सर्वेश देवरुखकर, देवयानी देवरुखकर, योगेश मोरे,अभिजीत गडकरी, ओंकार कोळेकर,पुष्पक पांढरबळे, रमजान मुल्ला, आशिष सातपुते या कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित होत आहेत.प्रदर्शन सकाळी १०.३० ते सायंकाळी ८.३० या वेळेत खुले राहील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes