Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदानमहापौर चषक फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ ! वेताळमाळ, पाटाकडील संघाची तालीम विजयी सलामी !!महिला - बाल कल्याण समितीच्या सभेत अंगणवाडी सक्षमीकरणावर चर्चाजीवन प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी  घागर मोर्चाराजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई ! सात हातगाड्या जप्त, अनधिकृत शेड्स हटवले ! ! गोकुळच्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी, संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रकगुरुदेव -कार्यकर्ते हळहळले ! विवेकानंद परिवार गहिवरला !!गोकुळवर प्रशासक नियुक्त, पाच अधिकाऱ्यांचे प्रशासक मंडळमहापौर चषक फुटबॉल पाच मेपासून ! सोळा संघांचा सहभाग !!शिक्षक बँकेतर्फे नऊ टक्के व्याजदराने दहा लाख विनाकपात क्लिन कॅश क्रेडिट कर्ज - चेअरमन वर्षा केनवडे

जाहिरात

 

विनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदान

schedule06 May 26 person by visibility 12 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : इचलकरंजी येथील लायन्स क्लब तर्फे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना लायन्स गौरव पुरस्कार 2025-26 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार उगार शुगर वर्क्स लि.चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सोहन शिरगावकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

    विनायक भोसले यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट व्यवस्थापन केल्यामुळे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. याप्रसंगी भोसले यांचे कुटुंबीय, घोडावत शैक्षणिक संकुलातील सहकारी, मित्रपरिवार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना  भोसले म्हणाले , की संजय घोडावत यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेली साथ यावरच आत्तापर्यंतचे कार्य करू शकलो आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद, पत्नीने उचललेली घराची व मुलांची जबाबदारी, संस्थेतील सर्व सहकाऱ्यांची मदत यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थेत काम करत असताना केवळ बॉस या भूमिकेत न राहता लीडर म्हणून कार्य करत असल्याचे समाधान व्यक्त केले. या पुरस्कारामुळे औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत राहण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes