Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महिला - बाल कल्याण समितीच्या सभेत अंगणवाडी सक्षमीकरणावर चर्चाजीवन प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी  घागर मोर्चाराजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई ! सात हातगाड्या जप्त, अनधिकृत शेड्स हटवले ! ! गोकुळच्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी, संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रकगुरुदेव -कार्यकर्ते हळहळले ! विवेकानंद परिवार गहिवरला !!गोकुळवर प्रशासक नियुक्त, पाच अधिकाऱ्यांचे प्रशासक मंडळमहापौर चषक फुटबॉल पाच मेपासून ! सोळा संघांचा सहभाग !!शिक्षक बँकेतर्फे नऊ टक्के व्याजदराने दहा लाख विनाकपात क्लिन कॅश क्रेडिट कर्ज - चेअरमन वर्षा केनवडे विवेकानंद कॉलेजची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायमगोकुळमध्ये रक्तदान शिबिर, ४०० रक्तदात्यांचा सहभाग

जाहिरात

 

महिला - बाल कल्याण समितीच्या सभेत अंगणवाडी सक्षमीकरणावर चर्चा

schedule05 May 26 person by visibility 24 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर: जिल्हा परिषद कोल्हापूर येथील महिला बाल कल्याण समितीची सभा सभापती विद्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्वर्गीय वसंतराव नाईक समिती सभागृहात झाली. अंगणवाडी सक्षमीकरणावरही विशेष भर देण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अंगणवाडी इमारती उभारणे तसेच जीर्ण नादुरुस्त इमारतींची तातडीने दुरुस्ती करण्याच्या आराखड्यावर चर्चा झाली.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांनी तसेच नवनियुक्त सदस्य वर्षाराणी पाटील, शिवानी भोसले, शैलजा पाटील, रोहिणी आबिटकर, संयोगिता मोरे, सोनाली पाटील आणि पंचायत समिती गडहिंग्लजच्या सभापती प्रतिभा चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी सन २०२६-२७ या वर्षातील विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आलासभेत विविध महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यात कार्यरत महिला समुपदेशन केंद्रांच्या मानधनवाढीचा मुद्दा चर्चिला गेला. यासंदर्भात जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.   याशिवाय ग्रामीण भागातील तळागाळातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी पावले उचलावीत, अशा सूचना सभेत देण्यात आल्या.

.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes