महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक 2024v स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा नेमबाजपटू स्वप्नील सुरेश कुसाळे यांनी कमाल करत नेमबाजीमध्ये अंतिम फेरी धडक मारली. एक ऑगस्ट 2024 रोजी अंतिम स्पर्धा होणार आहे. दरम्यान बुधवारी, 31 जुलै रोजी झालेल्या पात्रता स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने सातव्या स्थानावर राहून 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये 590 गुणांची कमाई केली आणिज्ञअंतिम फेरीत स्थान निश्चित केले. स्वप्निल कुसाळे हा मूळचा राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील आहे. त्याने यापूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये पदके मिळवले आहेत. टोकियो येथे 2020 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत त्याची संधी पात्रता फेरीत हुकली होती. यंदा मात्र त्याने अंतिम फेरीत पोहोचत देशवासीयांची अपेक्षा उंचावली आहे. स्वप्निल हा भारतीय रेल्वे मध्ये टीसी म्हणून कार्यरत आहे. बालेवाडी पुणे येथे सराव केला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक सुरेश कुसाळे यांचा स्वप्निल हा चिरंजीव. आपल्या नेमबाजीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.