करवीर काशी फौंडेशन-कर्तृत्व सामाजिक संघटनेतर्फे पूरग्रस्तांना मदत
schedule05 Aug 21 person by visibility 193 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर काशी फौंडेशन व कर्तृत्व सामाजिक संघटनेतर्फे शिरोली येथील हजरतपीर बालेखान दर्गाह परिसरातील पूरग्रस्तांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी करवीर काशी फौंडेशनचे प्रमुख सुनीलकुमार सरनाईक, स्वरूप पर्णकुटी चे कैलास माने, ‘हॉटेल रामकृष्ण इन’चे संचालक विराज सरनाईक, वीज महावितरण कंपनीतील सेवानिवृत्त अभियंता महेश जाधव, विनित जिरगे, संजय जाधव, गणेश कसबेकर, प्रतिक हेंगिष्टे,व्ही.आर.कुलकर्णी, दिलीप मसाले आदींनी परिश्रम घेतले. याशिवाय शिरोली नाक्यावर असलेल्या रहिवाशांना, तसेच तावडे हॉटेलसमोरील मूर्ती विक्रेते, सिध्दार्थनगर व शुक्रवार पेठेतील शंकराचार्य मठाशेजारील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली.