स्वयंप्रेरिकातर्फे चार दिवसीय खाजा-पिजा-लेजा प्रदर्शन
schedule30 Jan 26 person by visibility 14 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कागल आणि डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशन याच्या सहकार्याने भारत हौसिंग सोसायटी, राजारामपुरी येथे ‘खाजा-पिजा-लेजा’ प्रदर्शन व विक्री आयोजित केले आहे. हे प्रदर्शन तीस जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत खुले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन हस्तकला सेवा केंद्र कोल्हापूरच्या सहायक संचालक पल्लवी जांभूळकर यांच्या हस्ते झाले. शरद आजगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रदर्शनामध्ये विविध हस्तकला वस्तू, रेडीमेड वस्तू, स्वेटर, ज्वेलरी, मातीची भांडी, पर्स, वाळवणीचे पदार्थ, गावरान सेंद्रिय धान्य, सेंद्रिय भाज्या, रानमेवा कोकण मेवा, बांबू पासून वस्तू, गोधडी स्टॉल, ग्रास चटई, काश्मिरी ड्रेस याचा समावेश आहे. चुलीवरची पुरणपोळी, उसाचा रस व रसाची कुल्फी, नाचणी मोदक व चटपटीत खाद्यपदार्थांचे स्टॉल असून खवय्यांसाठी खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत.