न्यू कॉलेजमध्ये संख्याशास्त्र विभागामार्फत स्टॅटस्पार्क 2026 चे आयोजन
schedule30 Jan 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : : येथील न्यू कॉलेजमधील संख्याशास्त्र विभागातर्फे स्टॅटस्पार्क २०२६ हा शैक्षणिक उपक्रम बीएस्सी भाग एकच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला. विविध महाविद्यालयांतील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. या उपक्रमात पी.व्ही.पी. महाविद्यालय कवठेमहांकाळ, बलवंत कॉलेज विटा, पी.डी.व्ही.पी. महाविद्यालय तासगाव, एम एच महाविद्यालय तिसंगी, राजाराम कॉलेज कोल्हापूर, गोखले कॉलेज कोल्हापूर, आर.सी. शाहू कॉलेज कोल्हापूर आणि विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
उद्घाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सांख्यिकी विभाग मुंबई येथील विभागीय अधिकारी रुपाली कर्णे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. कॉलेजचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. एन. व्ही. पवार आणि प्रबंधक श्रीमती. एम. वाय. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. समन्वयक आणि संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. जी. गोडसे यांनी उपक्रमाचा आढावा घेतला. तेजश्री पाटील यांनी आभार मानले.
सरिता यादव, रूपाली कर्णे शुभम शिंदे यांनी संख्याशात्रातील संधीसंबंधी चर्चा केली. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे मूल्यमापन प्रा. लतीका शिंदे यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह “सांख्यशास्त्रातील ध्रुवतारा” हे पुस्तक भेट दिले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे दिली. पुरस्कार वितरणाचे कार्य डॉ. ए. ए. कलगोंडा, डॉ. पवार आणि विजय कोष्टी यांच्या हस्ते पार पडले.