जिल्हा परिषदेच्या पाचगाव मतदारसंघात संग्राम पाटील विरुद्ध याज्ञसेनी महेश पाटील
schedule21 Jan 26 person by visibility 59 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पाचगाव मतदारसंघात पुन्हा एकदा महाडिक गट विरुद्ध पाटील गट अशी लढत रंगणार आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून अॅड याज्ञसेनी महेश पाटील तर काँग्रेसकडून माजी सरंपच संग्राम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षीय चिन्हावर लढत असले तरी मतदारसंघात आमदार महाडिक गट विरुद्ध आमदार पाटील गट असाच सामना असणार आहे.
आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडीची पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे. उमेदवार संग्रामप पाटील हे माजी लोकनियुक्त सरपंच आहेत. ते, आमदार पाटील यांचे समर्थक आहेत. सध्या त्यांच्या पत्नी प्रियांका पाटील या पाचगावच्या सरपंच आहेत. संग्राम पाटील यांनी बुधवारी, २१ जानेवारी रोजी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पाटील यांना पक्षाचा एबी फॉर्म सुपूर्द केला. संग्राम पाटील यांच्या समर्थकांनी, पाचगावमधून मोटारसायकल रॅलीद्वारे जात उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून पाचगाव पंचायत समिती सदस्यपदासाठी सीमा पोवाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. पाचगाव ग्रामपंचायतीचे सदस्य संग्राम पोवाळकर यांच्या त्या पत्नी आहेत.
पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून अॅड. याज्ञसेनी महेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पाचगाव मतदारसंघातून भाजपकडून अॅड. याज्ञसेनी पाटील व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भिकाजी गाडगीळ यांचे चिरंजीव सौरभ गाडगीळ इच्छुक होते. दोघेही निवडणुकीची तयारी करत होते. खासदार धनंजय महाडिक यांनी गाडगीळ व महेश पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. बुधारी सकाळी उमेदवारी निश्चित झाली. या चर्चेअंती अॅड याज्ञसेनी पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. खासदार महाडिक यांच्या हस्ते महेश पाटील यांच्याकडे पक्षाचा एबी फॉर्म दिला. यावेळी भिकाजी गाडगीळ व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपकडून पाचगाव पंचायत समितीसाठी पाचगावच्या माजी उपसरपंच दिपाली संजय पाटील या उमेदवार आहेत.