Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
 प्रभाकरपंत कोरगांवकर हे समाज परिवर्तनाचे माध्यम होते-प्राचार्य ईस्माइल पठाण कसबा बावडा - लाईन बझार परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई कराडेप्युटी सीईओ ओमप्रकाश यादवांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीरकेडीसीसीच्या संचालकांची लंडन हाऊसला भेट ! हा आयुष्यातील आनंदाचा दिवस -हसन मुश्रीफपी.एस. घाटगे यांचा खासगी शिक्षक महासंघात प्रवेश ! राज्य प्रवक्तापदी निवड !!प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांचे निधनक्रिडाई कोल्हापूरतर्फे अभियंता दिनी रक्तदान शिबिरभागीरथी संस्था आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेत महिलांची धमाल ! कलाकारांची हजेरी !!महापालिका उपायुक्त कपिल जगताप यांची बदली     २०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीमधून सवलतीसाठी सरकार सकारात्मक- शिक्षणमंत्री दादा भुसे

जाहिरात

 

सांगलीत आजी-माजी खासदार भिडले, विशाल पाटील-संजय पाटील यांच्यामध्ये वादावादी !!

schedule07 Oct 24 person by visibility 1011 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लोकसभा निवडणूक होऊन चार महिन्याचा कालावधी होत आला पण सांगली लोकसभा मतदारसंघातील खासदार विशाल पाटील व माजी खासदार संजय पाटील यांच्यातील वाद काही संपायची चिन्हे नाहीत. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी, तासगाव नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभ होता. या कार्यक्रमातच आजी-माजी खासदारांनी एकमेकांवर तोंडसुख घेतले. भाषणा दरम्यान आक्षेप घेतल्याने गोंधळात आणखी भर पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेतली. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना मागे रेटले. या साऱ्या प्रकरणामुळे तासगाव नगरपालिकेच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रम भलताच गाजला.
 13 कोटी रुपये खर्च चार मजली नवीन इमारत उभारले आहे. माजी खासदार संजय पाटील यांची नगरपालिकेत सत्ता असताना 2016 मध्ये या इमारतीला मंजुरी मिळाली होती. नवीन प्रशासकीय इमारतीसाठी माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी ही पूर्वी प्रयत्न केले होते. 2016 मध्ये या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. मात्र या नद्या कारणामुळे बांधकाम रखडले होते. रेंगाळलेले काम पूर्ण होण्यासाठी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पाठपुरावा केला होता. कैलासवासी वि. स. पागे यांच्या नावाने ही प्रशासकीय इमारत उभारले आहे. सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री खाडे, आमदार सुमन पाटील व आजी-माजी खासदार यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात तासगाव रिंगरोडची मंजुरी आणि श्रेयवाद हा वादास कारणीभूत ठरला. खासदार विशाल पाटील यांनी तासगाव रिंग रोडच्या मंजुरीचा विषय मांडला. रिंग रोडचे श्रेय त्यांनी रोहित पाटील यांना दिले. माजी खासदार संजय पाटील यांनी भाषण करत असताना विशाल पाटील यांनी उपस्थित केलेल्या काही मुद्यांना आक्षेप घेतला. विशाल पाटील हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सोयीची भूमिका घेत नेत्यांना फसवत असल्याचा टोलाही संजय पाटील यांनी लगाविला. तेव्हा विशाल पाटील हे उभे राहून संजय पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देऊ लागले. जाहीर कार्यक्रमातच एकमेकावर आरोप, प्रत्यारोप होऊ लागले. दोघेही आमनेसामने होते. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. नेतेमंडळीमध्ये जुंपल्यामुळे कार्यकर्तेही व्यासपीठाच्या दिशेने सरसावले. संजय पाटील यांचे समर्थक व्यासपीठाकडे विशाल पाटील यांच्या दिशेने आले. व्यासपीठावर दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू होते. आरोप, प्रत्यारोप, कार्यकर्त्यांचा गोंधळ यामुळे कार्यक्रमात तणाव निर्माण झाला. परिस्थितीवर नियंत्रण आणताना प्रशासनाची दमछाक झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना मागे हटविले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes