कोल्हापुरात डेप्युटी सीईओ, बीडीओसह २९ अधिकारी सामूहिक रजेवर
schedule04 Dec 25 person by visibility 77 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वर्धा जिल्ह्यातील आर्वीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांना मनरेगा प्रकरणी प्रशासकीय चौकशी न करता, वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता मंगळवारी अटक झाली आहे. या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा परिषदेतील २९ अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तीन ते पाच डिसेंबर २०२५ या कालावधीत सामूहिक रजेवर जात असल्याचे निवेदन त्यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तेकेयन एस यांना दिले आहे.
मुख्यालय व पंचायत समित्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्या नेतृत्वाखाली सीईओंना निवेदन दिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जयवंत उगले, माधुरी परीट, ग्रामसेवक प्रशिक्षक केंद्राच्या प्राचार्या श्वेता काळे – यादव आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. सीईओंना दिलेल्या निवेदनावर ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील व्याख्यात्या श्रीमता साधना पाटील, व्याख्यात भरत चौगले, आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत, चंदगडच्या गटविकास अधिकारी वृक्षाली दादासो यादव, गडहिंग्लज येथील गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, गगबावडा येथील गटविकास अधिकारी अलमास मुणिर सय्यद, भुदरगड येथील डॉ. शेखर बाबासो जाधव, हातकणंगले येथील गटविकास अधिकारी श्रीमती शबानाबेगम अब्बास मोकाशी,कागल येथील गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, करवीर येथील गटविकास अधिकारी संदीप भंडारे, पन्हाळा येथील गटविकास अधिकारी श्रीमती सोनाली माडकर, शाहूवाडी येथील गटविकास अधिकारी मंगेश कुंचेवार, शिरोळ येथील गटविकास अधिकारी नारायण घोलप, गडहिंग्लज येथील सहायक गटविकास अधिकारी विलास पाटील, गगनबावडा येथील सहायक गटविकास अधिकारी सुप्रिया पाटील, हातकणंगले येथील सहायक गटविकास अधिकारी उद्धव महाले, कागल येथील सहायक गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर, करवीर येथील सहायक गटविकास अधिकारी सुहास पाटील, पन्हाळा येथील सहायक गटविकास अधिकारी शिवाजी पवार, राधानगरी येथील सहायक गटविकास अधिकारी अविनाश कामत, शाहूवाडीतील सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील,शिरोळ येथील सहायक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे, जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील सहायक गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम, राजाराम लांबोरे यांच्या नावानिशी तीन दिवस सामूहिक रजेवर जात असल्याचे निवेदन दिले.