+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली adjustमंडलिकांच्या विजयासाठी घर टू घर चिन्ह पोहोचवा- राजेश क्षीरसागर adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे.
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Feb 24 person by visibility 1630 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वयंम (swayam) व मूकच्या (mooc) धर्तीवर शिवाजी विद्यापीठ - संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांना स्वत:चे स्कील इनहान्समेंट कोर्सेस, ई कन्टेंट हे कोर्सेस तयार करण्याची सुविधा मध्ये उपलब्ध करुन देण्यासंबंधींचा महत्वपूर्ण ठराव अधिसभेने मान्य केला आहे. अधिसभा सदस्य प्रा. डॉ. मंजिरी अजित मोरे यांनी नुकत्याच झालेल्या अधिसभेत हा विषय मांडला होता. अधिसभेच्या मान्यतेनंतर विद्यापीठ प्रशासनाकडून प्राध्यापकांना संबंधित कोर्सेस तयार करुन देण्याची सुविधा मिळाल्या तर कमी दरात मटेरिअर विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. शिवाय प्राध्यापकांचे वेगवेगळे गट बनवून कोर्सेस तयार केले व ते विद्यापीठाच्या वेबसाइटवर अपलोड केल्यास विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी सूचना त्यांनी केली.
 नवीन शैक्षणिक धोरणानुसार २०२४-२५ पासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये स्कील इनहॉन्समेंट व इतर अनुषांगिक कोर्सेस समाविष्ट केले आहेत. काही कोर्सेस स्वयंम व मूकमध्ये ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध आहेत. मात्र अन्य शैक्षणिक संस्थांकडून कोर्सेस तयार होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. युजीसीने तब्बल ११८३ कोर्सेसला मान्यता दिली आहे.
 या पार्श्वभूमीवर अधिसभा सदस्य मंजिरी मोरे यांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन महत्वाचा ठराव अधिसभेत मांडला. यामध्ये त्यांनी ‘स्वयंम व मूकवर उपलब्ध असणारे कोर्सेस आणि सध्या विद्यार्थी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम यामध्ये विसंगती आहे. ऑनलाइन उपलब्ध असणाऱ्या कोर्सेसच्या परीक्षेची वेळ व विद्यापीठात घेण्यात येणाऱ्या परीक्षांची वेळ ही एक होऊ शकते. ऑनलाइन उपलब्ध कोर्सेसची परीक्षा घेण्याची पद्धत ही विद्यापीठ घेत असलेल्या परीक्षा पद्धतीपेक्षा वेगळी आहे.शिवाय त्या कोर्सेसची फी एक हजारापासून काही हजारात आहे, इतकी फी विद्यार्थ्यांना शक्य होणार नाही’ या साऱ्या विषयाकडे लक्ष वेधले.
  ‘अन्य शैक्षणिक संस्थेकडील कोर्सेसचा अभ्यासक्रम, परीक्षेचा वेळ व परीक्षेची पद्धत आणि विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या परीक्षेचा कालावधी यामध्ये अडचणी येत आहेत. या कोर्सेसची फी आणि वेळेचा अपव्यव होऊन विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. यासंबंधी डॉ. मोरे यांनी म्हटले आहे, ‘ शिवाजी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांना स्वत:चे स्कील इनहान्समेंट कोर्सेस, ई कन्टेंट हे स्वयंम व मूकशी अनुसरुन कोर्सेस तयार करण्याची सुविधा शिवाजी विद्यापीठामध्ये उपलब्ध करुन द्यावी.” त्यांनी मांडलेला हा ठराव अधिसभेने मंजूर करुन यासंबंधीची अंमलबजावणी करण्याची शिफारस अधिकार मंडळाला केली आहे. कॉलेज स्तरावर ऑनलाइन कोर्सेस तयार करण्यासाठी हाय इंटरनेट कनेक्टिव्हिटी, अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर्स, हार्डवेअर असणे गरजेचे असून या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे म्हटले आहे.