स्वच्छतेच्या कामात हयगय, आरोग्य निरीक्षकासह तीन मुकादमांना नोटीस
schedule07 Nov 24 person by visibility 89 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शास्त्रीनगर येथील वर्कशॉमध्ये नियमित वेळेपक्षा जास्त वेळ ॲटो टिप्पर वर्कशॉपमध्येच उभी असल्याने या ॲटो टप्परचे सात ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी काढले. तसेच शहरात प्रशासकांनी फिरती करताना कामामध्ये हलगर्जीपणा केल्याने आरोग्य निरिक्षक मनोज लोट, मुकादम भगवान सातपुते, धनाजी खिलारे, कुलदिप कांबळे यांनाकारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी गुरुवारी सकाळी शास्त्रीनगर येथील वर्कशॉपला भेट दिली. यावेळी त्यांना वर्कशॉपमध्ये सात ॲटो टिप्पर सकाळी साडेसहानंतरही वर्कशॉपमध्येच उभे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी या गाडीवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरी मेनरोड, बाजारपेठ, माळकर तिकटी, मटण मार्केट, भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, राजर्षी शाहू समाधी स्थळ व पंचगंगा घाट या परिसरात फिरती करुन स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी या ठिकाणी कच-याचे ढिग आढळून आल्याने व कामात हलगर्जीपणा केल्याने एक आरोग्य निरिक्षक व तीन मुकादमांना सायंकाळी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.