Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वीज कंत्राटी कामगार संघाची पुण्यात बैठक ! तर ३० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन !! लिंगायत माळी समाज कोल्हापूरतर्फे नऊ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारकोल्हापुरात दोन दिवसीय समर यूथ समिटस्वातंत्र्यदिनापासून धावणार ई बसेस ! कोल्हापुरात होणार सिमेंटचे रस्ते !! कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूरमहापुराच्या उपाययोजनेसंबंधी दोन खासदार, सात आमदारांचे जलसंपदामंत्र्यांना पत्रऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावगोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार, मंत्री मुश्रीफ आमच्या सोबत असतील - धनंजय महाडिकवडिलांना मिठी मारताच नवीद मुश्रीफ झाले भावूककोल्हापूर महानगर भाजप अध्यक्षपदी विजय जाधव

जाहिरात

 

वैद्यकीय सेवेबद्दल सिद्धगिरी जननीच्या डॉ. वर्षा पाटील यांचा सन्मान

schedule31 May 25 person by visibility 43 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना वैद्यकीय कक्ष, खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्यावतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी पश्चिम महाराष्ट्र येथील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय संस्था (हॉस्पीटल) यांचा सन्मान सोहळा लोटस कार्यालय, मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे झाला. याप्रसंगी वंध्यत्व निवारणासाठी कोणतेही मानधन न घेता करणाऱ्या सिद्धगिरी जननी आय व्ही एफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या संचालिका व विभाग प्रमुख डॉ. वर्षा विवेकराव पाटील यांचा सन्मान आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुहास बाबर, रानू महाराज वास्कर, माजी आमदार सुजित मिणचेकर, डॉ ज्योति वाघमारे, सुजित चव्हाण यांच्या हस्ते  विशेष सन्मान करण्यात आला.  वंध्यत्व निवारणासाठी कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर  स्वामी यांच्या प्रेरणेने भारतातील पहिले ट्रस्ट श्रेणीतील आय व्ही एफ टेस्ट ट्युब बेबी सेंटर कार्यान्वित केले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे वात्सल्य सुखा पासून वंचित राहू नये यासाठी डॉ. वर्षा पाटील  विशेष परिश्रम घेत आहेत. अत्यंत माफक दरात त्या अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा देत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकातील असंख्य  नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत. डॉ. वर्षा  पाटील यांनी दिलेल्या विनामोबदला सेवेबद्दल त्यांचा हा सन्मान वैद्यकीय क्षेत्रासाठी एक आदर्श ठरला आहे या कार्यक्रमास मंगेश चिवटे, प्रशांत साळुंखे, रामहरी राऊत उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes