Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती – भरत रसाळेकोल्हापुरात गुरुवारी महाराष्ट्र धर्म याविषयी परिषदकोल्हापूर मेट्रोसिटीसाठी राजू मानेंचे धरणे आंदोलनराष्ट्र सेवा दलातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा - जिल्हास्तरीय मेळावापाच- सहा जूनला रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळाप्रशासनाधिकारी डी. सी.कुंभारांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, पोलिसांची कारवाईजिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक सदस्यांसोबतच, लवकरच निवडी होणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकरप्रवेश प्रक्रिया विना डोनेशन पूर्ण करा, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये - आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेतर्फे कर्मचाऱ्यांना २५ टक्क्यांहून अधिक पगारवाढशिवसेना नेहमीच मराठा समाजासोबत, समाजाला न्याय देण्याची भूमिका - मंत्री उदय सामंत

जाहिरात

 

निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती – भरत रसाळे

schedule02 Jun 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक

हाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : "निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती असून, ती प्रत्येकाने आरोग्य व अध्यात्म शिबिराच्या माध्यमातून प्राप्त करावी," असे प्रतिपादन .महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांनी केले.

 मानस योग साधना परिवार कोल्हापूरतर्फे आयोजित आरोग्य व अध्यात्म शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते . जय पॅलेस सांस्कृतिक भवन येथे हे  दोन ते ८ जून २०२६ या सात दिवसाच्या  कालावधीत हे शिबिर होत आहे. शिबिरामध्ये निरोगी जीवनशैली, सूक्ष्म व्यायाम, योग्य आहारपद्धती, शरीरशुद्धी, तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मेरठ येथील आरोग्य तज्ज्ञ डॉ. गोपाल शास्त्री हे सात दिवस शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.  शिक्षक नेते सुधाकर सावंत यांनी शिबिर आयोजनामागील उद्देश केला. यावेळी प्रभाकर हेरवाडे, आर. डी. पाटील, राजेश वरक, उमेश देसाई, बाबासाहेब लाड, संदीप जाधव, विठ्ठल दुर्गुळे, जोतिबा जाधव, सुनील पाटील, महादेव डावरे, अनिल शेलार, शकुंतला मोरे, चारुलता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या शिबिरामध्ये सांगली बेळगांव कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे २५० शिबिरार्थीं शिक्षक बंधू भगिनीनी सहभाग नोंदविला आहे. संजय कडगावे यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी आभार मानले.""

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes