Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजकारण्यांच्यापेक्षा लोकांसाठी झटणारी समाजरत्ने समाजासमोर झळकली पाहिजेत-प्रकाश आबिटकरमॅनेजमेंटसाठी पाच अर्ज वैध, भाटियांचा अर्ज अवैध ! हंगेरगीकरांच्या उमेदवारीला सुटाचा आक्षेप !कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट ! सरकारने गरिबांच्या शिक्षणाचे दायित्व निभवावे- पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटीलप्रा. दत्ता जाधव यांना पीएचडीराष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाची दमदार कामगिरीव्यवसाय परवाना दरवाढीला व्यावसायिकांचा विरोध ! महापालिका अन् चेंबर ऑफ कॉमर्स आमनेसामने !!बुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, सर्वाधिक बक्षीसाची स्पर्धा शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन जागेसाठी सहा अर्जदूध विक्रीत गोकुळचा नवा रेकॉर्ड ! कर्मचाऱ्यांनी केला चेअरमनांचा सत्कार

जाहिरात

 

पालकमंत्र्यांनी बुलेट चालवत नोंदविला मिलेट महोत्सव रॅलीत सहभाग

schedule22 Mar 25 person by visibility 159 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषि विभाग कोल्हापूर यांच्यावतीन शनिवारी भुदरगड तालुक्यातील कूर येथे मिलेट महोत्सवाचे आयोजन केले होते. या महत्त्वाच्या उद्घाटनप्रसंगी रॅली काढण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः बुलेट चालवत मिलेट रॅलीमध्ये सहभाग घेतला.   पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ झाला. या मिलेट रॅलीचे कूर -कोनवडे- नीळपण- दरवाड- म्हसवे- गारगोटी - कूर या मार्गावर आयोजन केले होते. विशेष म्हणजे पालकमंत्री आबिटकर यांनी स्वतः बुलेट चालवत या रॅलीमध्ये इतरांना प्रोत्साहित केले . यावेळी पालकमंत्र्यांनी पौष्टिक तृणधान्य स्टॉलना भेट देत कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर,पॉवर टिलर,रोटावेटर चे वाटप केले .

या महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांना डॉ योगेश बन (नाचणी पैदासकार) यांनी बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही आता काळाची गरज बनली असल्याचे सांगितले . शेतकरी मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य लागवडीबद्दल  अनुभव कथन केले. ऊस लागवडीबाबत सुरेश माने-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
     यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत मयत शेतकऱ्यांच्या 19 वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मंजुरी पत्र दिली. फळबाग लागवड उत्कृष्टपणे राबवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले . या पौष्टिक तृणधान्ये महोत्सवामध्ये पाककला स्पर्धा झाली. यावेळेस विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे , रक्षा शिंदे , गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे मदन देसाई.अजित देसाई, माजी उपसभापती मदन पाटील, कूरचे सरपंच कल्याणराव निकम, अशोकराव फराकटे,अशोकराव भांदिगरे, बाबा नांदेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अधिकारी किरण पाटील नितीन भांडवले सुनील कांबळे  यांनी नियोजन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes