Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विविध ग्रंथांचे प्रदर्शन अन् वाचण्यासाठी मोफत पुस्तके ! विद्यापीठाचा वाचन चळवळीला बळकटीचा उपक्रम !! दर्पण फाऊंडेशनतर्फे किशोरप्रेमींसाठी सांगितिक मैफिलडीवाय पाटील मेडिकल संघाला विजेतेपदराष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये आर्यवर्त यादवचे यशसंलग्नीकरण फीमध्ये आता सहा वर्षानी वीस टक्के वाढ, कॉलेजिअसना दिलासा ! अधिसभेची शिफारस !!आनंद माने, सागर डेळेकर. सचिन पाटील, संदीप मगदूमसह पाच जणांना पुरस्कार ! चार जानेवारीला पुरस्कार वितरण !!आता ‘धस’ होतय काळजात ! आय सपोर्ट प्राजक्ता !!वीज कंत्राटी कामगार संघातर्फे प्रकाश आबिटकरांचा सत्कारकुंभी, पंचगंगा कारखान्याचा ऊसदर सर्वाधिक ! खासगीमध्ये दालमिया अव्वल !!शाहू शिक्षण संस्थेतर्फे श्रीपतराव बोंद्रे यांची जयंती साजरी

जाहिरात

 

गोकुळची दुग्ध उत्पादने देशाच्या सीमापार, देशी लोणी आता युरोप-आशिया बाजारात !!

schedule03 Oct 24 person by visibility 200 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उच्च प्रतीच्या दुधासाठी गोकुळ प्रसिद्ध. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चविष्ठ व दर्जेदार दुग्धजन्य पदार्थांची चव प्रत्येकाच्या जीभेवर आहे. गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री आता परदेशात सुरू झाली आहे. पूर्व युरोपधील अझरबैजान या देशाला गोकुळची देशी लोणी निर्यात केली आहे. गाय दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात केली जाणार आहे. याद्वारे गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आशिया व युरोपातील देशामध्ये उपलब्ध होणार आहेत.
 गोकुळतर्फे परदेशात केलेली ही पहिलीच थेट निर्यात आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ४२ मे. टनाचे वातानुकूलित कंटेनर अझरबैजान देशाला पाठविण्‍यात आले. या वाहनाचे पुजन व निर्यात शुभारंभ संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते गोकुळ प्रकल्प येथे करण्यात आला.
   चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, गोकुळची उत्‍पादने नेहमीच गुणवत्तापूर्ण असल्‍याने गोकुळला मानाचे स्‍थान निर्माण झाले आहे. संघामार्फत वेगवेगळे दुग्ध पदार्थ मार्केटमध्ये विक्री केले जातात, दुग्ध पदार्थांची विक्री वाढवण्याच्या दृष्टीने व अतिरिक्त गाय दुधाची निर्गत होणेसाठी गाय दुधाचे पदार्थ निर्यातीसाठी संघातर्फे प्रयत्न सुरू होते. याचाच एक भाग म्हणून अझरबैजान या देशांमधील मे. अटेना डेअरी यांनी संघाचे गाय देशी लोणी (बटर) खरेदी केली .नजीकच्या काळामध्ये  अटेना ग्रूप यांनी संघाकडून आणखी लोणी, दूध भुकटी व तूप खरेदी करण्यामध्ये स्वारस्य दाखवले असून त्यांना संघाचे दुग्ध पदार्थ निर्यात करण्यात येतील व भविष्यात इतर देशांना हि गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.
 पश्चिम आशियातील व पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघ गोकुळकडून गाय तूप, लोणी आणि दूध भुकटी यांची आयात करून ते रशिया, अझरबैजान, कजाकिस्तान, इराण सह अशा वीस देशांमध्ये विक्री करणार आहेत.  याचा गोकुळ परिवारातील सर्व घटकांना अभिमान असून याचे सर्व श्रेय संघाचे संचालक मंडळ, लाखो दूध उत्पादक, हितचिंतक व संघाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना जाते. या निर्यातीसाठी संघाचे मार्केटींग अधिकारी यांनी व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतल्या बद्दल यावेळी त्यांचे कौतुक केले.
यावेळी संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, मार्केटींग व्यवस्थापक हणमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes