आयुष्यमानसाठी रेशनकार्डवर बारा अंकी नंबर त्वरित मिळावा - भाजपा शिष्टमंडळाने मागणी
schedule08 Jul 24 person by visibility 423 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आयुष्मान भारत योजनेसाठी आवश्यक असणारा शिधापत्रिकावर बारा अंकी नंबर त्वरित द्यावा आणि नागरिकांची अडवणूक थांबवावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना निवेदन दिले. यावेळी शहर पुरवठा अधिकारी नितीन धापसे-पाटील उपस्थित होते. जिल्हा पुरवठा कार्यालयातील कामासंबधित नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असल्या जिल्हाध्यक्ष यांनी नाराजी व्यक्त केली.
आयुष्यमान भारत योजना नवीन घोषित निर्णयाप्रमाणे केशरी व शुभ्र शिधापत्रिका धारकांना पाच लाखापर्यंत मोफत औषध उपचार मिळणे कारणी शहर पुरवठा कार्यालयातून बारा अंकी नंबर मिळण्यासाठी दिरंगाई होत आहे. या अनुषंगाने भाजपाने निवेदन दिले. भाजपा जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, पोर्टल, ई सेवा केंद्र येथे अर्ज करून अनेक महीने उलटून सुद्धा या कार्यालयाकडून सर्व सामान्य जनतेची अडवणूक केली जात आहे. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची वन नेशन वन रेशन आणि डिजिटल रेशनकार्ड ह्या संकल्पनेस धक्का पोहचू नये याची दक्षता घ्यावी.’
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, विजयसिंह खाडे-पाटील, रोहित पवार यांनी चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी डॉ. सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, शैलेश पाटील, विराज चिखलीकर, विजयसिंग खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, आशिष कपडेकर, रोहित पोवार, रमेश दिवेकर, संगीता खाडे, अभिजित शिंदे, महेश यादव, प्रग्नेश हमलाई, डॉ. शिवानंद पाटील, रविकिरण गवळी, कोमल देसाई आदी उपस्थित होते.