पन्हाळगडावर चार दिवस पर्यटन महोत्सव ! मुख्यमंत्र्यांची उपस्थिती !!
schedule03 Mar 25 person by visibility 678 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संस्कृती, इतिहास आणि पर्यटनाचा विकास या उद्देशाने राज्य सरकारचे पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने चार ते सात मार्च २०२५ दरम्यान किल्ले पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांसह ऐतिहासिक वस्तुंचे प्रदर्शन, पन्हाळगडाचा रणसंग्रमाम लघुपट अनावरण, गीतांचा कार्यक्रम, निमंत्रित चित्रकार व शिल्पकारांची प्रात्यक्षिके अशा स्पर्धा आहेत.
सहा मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळा किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या थ्रीडी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण होणार आहे. सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती पन्हाळा गिरिसथान नगरपरिषदेने दिली आहे. इंटरप्रीटेशन सेंटर पन्हाळा येथे चार मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता पन्हाळा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन व ऐतिहासिक वस्तुंच्या प्रदर्शनाला सुरूवात होणार आहे. पाच मार्च रोजी पन्हाळगडावर सायंकाळी चार वाजता शिवतीर्थ उद्यानासेमोर विद्यार्थी कलाकरांच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील जाज्वल्य आणि प्रेरणादायी प्रसंगांवर आधारीत ऐतिहासिक नृत्य-नाट्य व शिवजन्म ते शिवराज्यभिषेक सोहळा सादर होईल. सायंकाळी ५.३० वाजता संस्कार प्रस्तुत जीवनगाणे या कार्यक्रमात झी सारेगम विजेता प्रसेनजीत कोसंबी व झी सारेगम फेम स्वरदा गोडबोले यांचा मराठी व हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आहे.
सात मार्च रोजी निमंत्रित चित्रकार, शिल्पकार यांची प्रात्यक्षिके सकाळी ९ वाजलेपासून पन्हाळा येथील अंबरखाना परिसरात आयोजित करण्यात आली आहेत. सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ले या विषयावर इंस्टाग्राम रील्स, यु ट्युब व्हिडीओ व फोटोग्राफी स्पर्धा व पारितोषिक वितरण इंटरप्रीटेशन सेंटर पन्हाळा येथे होणार आहे. दरम्यान प्रादेशिक पर्यटन विकास योजना व वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत त्या ठिकाणी लाईट शो उभारणे, साऊंड शो उभारणे, लेजर शो तसेच इंटरप्रीटेशन सेंटर इमारतीचे काम व परिसराचे सुशोभिकरणाची कामे केली आहेत.