Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - वंचित - आप एकत्र ! 21 उमेदवारांची घोषणा, 81 जागा लढणार !! अभ्यासूवृत्तीला समाजकार्याची जोड, लोकांच्या प्रश्नाविषयी तळमळपीआरएसआय कार्यकारी समितीवर विवेक सिद्ध यांची निवडडीवाय पाटील आर्किटेक्चरच्या सिल्व्हर ज्युबिली बॅच विद्यार्थ्यांची महाविद्यालयास भेटप्रजासत्ताक दिन परेड शिबिरासाठी कोल्हापुरातील अकरा एनसीसी विद्यार्थ्यांची निवड शिवाजी विद्यापीठात होणार संत साहित्य संमेलनकृष्णराजनी भरला उमेदवारी अर्ज, महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात !!शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रमकोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सची कार्यकारिणी जाहीरपाचगावमधील होम मिनिस्टर स्पर्धेत शुभांगी गाडगीळ विजेत्या

जाहिरात

 

महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - वंचित - आप एकत्र ! 21 उमेदवारांची घोषणा, 81 जागा लढणार !!

schedule27 Dec 25 person by visibility 203 categoryमहानगरपालिका

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी यांनी एकत्र येऊन राजर्षी  शाहू आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीमध्ये विविध पक्ष सहभागी होणार आहेत. बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी सुद्धा यामध्ये सहभागी आहे या आघाडीतर्फे महापालिकेच्या 81 जागा लढविण्यात येणार आहेत अशी घोषणा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी कोल्हापुरात केली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई,  आणि वंचित बहुजन आघाडीचे अरुण सोनवणे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्रपणे लढत आहोत कार्यकर्ता पॅटर्न ही आमची संकल्पना आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील यांनी पुन्हा एकदा  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  व  आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले  महाविकास आघाडी अंतर्गत आम्हाला 11 जागा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. खासदार शाहू महाराजांची भेट घेतली. खासदार शाहू महाराज यांनी आमदार सतेज पाटील यांना राष्ट्रवादीला सोबत घ्या समाधानकारक जागा द्या असे सांगितले मात्र सतेज पाटील यांची कामकाजाची पद्धत ही मी म्हणेल ती पूर्व दिशा अशी आहे. त्यांनी कोणाचेही ऐकले नाही.
 राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 25 जागा लढवणार आहे. आम आदमी पार्टी 25 जागा तर वंचित बहुजन आघाडी 31 जागा लढवणार आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये 21  उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तिन्ही पक्ष आपापल्या  चिन्हावरती लढणार आहेत तसेच या आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षी सहभागी व्हावा यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले
 आज जाहीर झालेल्या 21 जागांमध्ये आम आदमी पार्टी पक्षाकडून प्रभाग क्रमांक दोन मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग गटामध्ये  उषा गणपती वडर प्रभाग क्रमांक पाच मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून समीउल्ला समीर लतिफ, प्रभाग क्रमांक आठ मधून सर्वसाधारण महिला गटातून दीप्ती अनिकेत जाधव, प्रभाग क्रमांक 13 मधून सर्वसाधारण गटातून मोईन इजाज मोकाशी,  प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून प्रसाद विजय सुतार, प्रभाग क्रमांक 18 मधून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांमधून अश्विनी सुरज सुर्वे तर प्रभाग क्रमांक 18 मधून सर्वसाधारण गटातून कुमाजी गजानन पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जाहीर झालेल्या  उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण  गटातून मकरंद अरुण जोंधळे, प्रभाग क्रमांक सहा मधून सर्वसाधारण महिला गटातून धनश्री गणेश जाधव, प्रभाग क्रमांक 16 मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून गणेश चंद्रकांत नलावडे,  प्रभाग क्रमांक 17 मधून सर्वसाधारण महिला गटात रंजिता नारायण चौगुले, प्रभाग क्रमांक 19 मध्ये अनुसूचित जाती गटातून दिनकर लक्ष्मण कांबळे,  प्रभाग19 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून रूपाली अमोल बावडेकर तर प्रभाग क्रमांक 20 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून प्राध्यापक हर्षल हरिदास धायगुडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रभाग क्रमांक तेरा मधून अनुसूचित जाती महिला गटातून राजश्री गणेश सोनवणे, प्रभाग क्रमांक 18 मधून सर्वसाधारण गटातून अमित पांडुरंग नागटिळे, प्रभाग क्रमांक 17 मधून  सर्वसाधारण गटातून प्रवीण अर्जुन बनसोडे, प्रभाग क्रमांक 16 मधून सर्वसाधारण ब गटातून राहुल विठ्ठल सोनटक्के, प्रभाग क्रमांक 11 मधून अनुसूचित जाती महिला गटातून पायाला सागर कुराडे, प्रभाग क्रमांक 14 क मधून सर्वसाधारण गटातून देवेंद्र विठ्ठल कांबळे तर प्रभाग क्रमांक तीन ड मधून सर्वसाधारण गटातून आकाश शामराव कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.   पत्रकार परिषदेला पक्ष निरीक्षक बाजीराव खाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार कार्याध्यक्ष अनिल घाटगे, पद्मा तिवले, रोहित पाटील, रामराजे बदाले, बीआरएसपीचे रामचंद्र कांबळे, आमचे उत्तम पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes