Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - वंचित - आप एकत्र ! 21 उमेदवारांची घोषणा, 81 जागा लढणार !! अभ्यासूवृत्तीला समाजकार्याची जोड, लोकांच्या प्रश्नाविषयी तळमळपीआरएसआय कार्यकारी समितीवर विवेक सिद्ध यांची निवडडीवाय पाटील आर्किटेक्चरच्या सिल्व्हर ज्युबिली बॅच विद्यार्थ्यांची महाविद्यालयास भेटप्रजासत्ताक दिन परेड शिबिरासाठी कोल्हापुरातील अकरा एनसीसी विद्यार्थ्यांची निवड शिवाजी विद्यापीठात होणार संत साहित्य संमेलनकृष्णराजनी भरला उमेदवारी अर्ज, महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात !!शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रमकोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सची कार्यकारिणी जाहीरपाचगावमधील होम मिनिस्टर स्पर्धेत शुभांगी गाडगीळ विजेत्या

जाहिरात

 

अभ्यासूवृत्तीला समाजकार्याची जोड, लोकांच्या प्रश्नाविषयी तळमळ

schedule27 Dec 25 person by visibility 19 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उमा शिवानंद बनछोडे म्हटलं की महापालिका सभागृहात अभ्यासपूर्णरित्या भूमिका मांडणाऱ्या आणि प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तळमळीने काम करणाऱ्या नगरसेविका असे चित्र डोळयासमोर उभे राहते. २०१५ ते २०२० या कालावधीत कोल्हापूर महापालिकेत बाजारगेट प्रभागातून त्या नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करत होत्या. त्या आता पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांकत सातमधून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेस पक्षातर्फे त्यांची उमेदवारी घोषित झाली आहे.

२०१५ मध्ये त्या बाजारगेट प्रभागातून निवडून आल्या होत्या. यंदा, चार प्रभागाची रचना एकत्रित झाली आहे. चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांत सातमधून सर्वसाधारण महिला गटातून त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी २६ डिसेंबर 2025 रोजी जाहीर केली. त्यामध्ये बनछोडे यांचा समावेश आहे. खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम करताना नेहमीच प्रभागातील विकासकामांना प्राधान्य दिले.. सासरे श्रीकांत बनछोडे, सामाजिक कार्यकर्ते व पती शिवानंद बनछोडे यांचे प्रोत्साहन, मदत प्रभागात विविध विकास कामांची अंमलबजावणी केली. प्रभागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. पापाची तिकटी परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभिकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

उमा बनछोडे यांना माहेर व सासर कडून सामाजिक कार्याचा वारसा लाभला आहे. त्या उच्चशिक्षित आहेत. विज्ञान शाखेतील पदवीधर आहेत. त्यांचे वडील शिक्षक तर आजोबा हे शिरोळचे माजी सरपंच. यामुळे लोकांचे प्रश्न, त्यांची सोडवणूक, सामाजिक, राजकीय विषयांची जाण आहे. बनछोडे कुटुंबीय तर कोल्हापुरातील सामाजिक, सहकार, राजकारण व व्यापार व्यवसाय क्षेत्रात. सासरे श्रीकांत बनछोडे यांनी महापालिकेवर नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यांनी नगरसेवकपदाच्या कालावधीत अनेक विकासकामे केली. विकासकामांचा तोच वारसा उमा बनछोडे व शिवानंद बनछोडे पुढे चालवित आहेत. उमा बनछोडे यांनी सभागृहात काम करताना अभ्यासू सदस्य म्हणून ओळख निर्माण केली. पाइपलाइन योजना, नगरोत्थान योजना, अमृत योजना, गाळेधारकांचे प्रश्न या विषयीवरील चर्चेत सहभाग घेतला. केएमटी व कामगारांचे प्रश्न सोडवणुकीला प्राधान्य दिले. नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सभागृहात पाठपुरावा करताना प्रसंगी रस्त्यावर उतरुनही आंदोलन केले. शहर विकासाच्या योजनेत सहभाग व नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्या पुन्हा महापालिका निवडणूक लढवित आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes