कोल्हापुरात रंगणार फुले - शाहू - आंबेडकरी जलसा, तीन दिवस कार्यक्रम
schedule04 Feb 25 person by visibility 163 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे पाच ते सात फेब्रुवारी २०२५ या कालावधीत फुले - शाहू - आंबेडकरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गायन समाज देवल क्लबमधील गोविंदराव टेंबे सभागृहात हा महोत्सव होत आहे.
पारंपरिक संस्कृतीची ओळख व थोर महापुरुषांचे प्रबोधनात्मक विचार नवीन पिढीपर्यंत पोहचावेत या उद्देशाने सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधनत्मक विचाराचा जागर असणारा फुले शाहू आंबेडकरी जलसा आयोजित करण्यात येत आहे. पाच फेब्रुवारीला शाहीर आझाद नायकवडी, नागसेन सावदेकर, वैभवी कदम, गणेश चंदनशिवे व सहकालाकार यांचे प्रबोधनपर गीतगायन सादर होईल.सहा फेब्रुवारीला शाहीर हेमंतराजे मावळे,प्रवीण डोणे, रागिणी बोदडे, रामलिंग जाधव व सहकलाकर यांचे सादरीकरण होईल.सात फेब्रुवारी रोजी शाहीर राजा कांबळे, अभिजित कोसंबी, प्रसेंजित कोसंबी व सहकलाकार आपले सादरीकरण करतील
कोल्हापुरात होणाऱ्या या फुले-शाहू-आंबेडकरी जलसामध्ये सहभागी कलाकाराचा किंबहुना या पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या कलापथकाचा, शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.