Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कहाणी जिद्दी मुलाची, सीए परीक्षेच्या यशाची ! अभिमानस्पद कामगिरी अन् भारावलेले आई-वडील !!कोल्हापूरच्या ३४ विद्यार्थ्यांचे सीए परीक्षेत यशअभिमान माळीचे सीए परीक्षेत यश, कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक !भक्ती ईश्वराची-सेवा मानवाची या संकल्पनेनुसार वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत-डॉ. सतीश पत्कीटीईटी विरोधातील मोर्चात जिल्ह्यातील शंभर  टक्के शिक्षक सहभागी होणार- आमदार जयंत आसगांवकरकोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आमदार राजेश क्षीरसागरकोरे अभियांत्रिकीत इंडस्ट्री रेडी इंजिनिअर प्रोग्रामकौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू - प्रचारप्रमुख श्रीराम साळुंखेलवकरच आचारसंहिता, पहिल्यांदा नगरपालिका, मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका –हसन मुश्रीफांचा अंदाजकेडीसीसीचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील, नेसरीच्या सरपंच गिरीजा शिंदे यांचा भाजपात प्रवेश

जाहिरात

 

खाजगी शाळातील शिक्षकांची साडेपाच हजार पदे भरणार : शिक्षण संचालक शरद गोसावी

schedule31 Jul 24 person by visibility 621 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील खाजगी शाळातील रिक्त असलेली साडेपाच हजार पदे पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे तत्काळ भरली जातील असे आश्वासन राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले.  महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक  समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिक्षण संचालक गोसावी यांची भेट घेऊन खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील शिक्षकांची भरती तात्काळ करावी अशी मागणी निवेदन देऊन केली त्यांची भेट घेतली.
  यावेळी कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे , एसएससी बोर्डाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग ,सचिव सुभाष चौगुले , प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर व अधीक्षक उदय सरनाईक हे उपस्थित होते .
 पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळा मधील शिक्षकांची 15000 पदांची भरती केली  पण खाजगी शाळातील रिक्त पदांची भरती केलेली नाही . त्यामुळे शाळांना शिक्षकांची कमतरता भासत आहे म्हणून खाजगी शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत . 
 यावेळी गोसावी म्हणाले की ,राज्यामध्ये खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील सध्या 5500 पदांची नोंदणी पवित्र पोर्टल प्रणाली द्वारे झालेली आहे याशिवाय उर्दू शाळामधील व आरक्षणामधील विना मुलाखत 1500 पदे भरावयाची आहेत अशी एकूण 7000 पदे रिक्त आहेत .पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे मागणी केलेल्या एका शिक्षक पदास अर्हताधारक दहा पात्र उमेदवारांची नावे संबंधित शाळेला कळवली जातील व त्यामधून त्यांनी एका शिक्षकाची निवड करावयाची आहे . शासनाकडे खाजगी शाळांनी मागणी केलेल्या साडेपाच हजार रिक्त पदासाठी गुणवते शनुसार पात्र असलेल्या 55 हजार उमेदवारांची नावे संबंधीत शाळांना कळविली जातील. त्यातून 5500 पदांची भरती केली जाईल . तसेच उर्दू शाळा व आरक्षणामधील बिना मुलाखत 1500 पदांचीही भरती केली जाणार आहे असेही  गोसावी यांनी स्पष्ट केले .
याशिवाय कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शाळानाही मोफत वीज व पाणी देण्याबाबत सरकार अनुकूल असून त्याबाबतही प्रयत्न केली जातील . खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असून तो शासनाकड पाठविला जाईल . वेतनेतर अनुदान हे सातव्या वेतन आयोगानुसार होणाऱ्या वेतनावर मिळावे अशी जी संघटनेची मागणी आहे त्याबाबतचा प्रस्तावही शासनाकडे सादर केला जाईल असे आश्वासन शिक्षण संचालक गोसावी यांनी दिले . शिष्टमंडळात राज्यसचिव शिवाजी भोसले , पतसंस्थेचे व्हा . चेअरमन सर्जेराव नाईक, मुख्याध्यापक आप्पासाहेब वागरे , सर्जेराव चव्हाण व संजय गोसावी हे सहभागी होते .
 .. . ..

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes