Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव माने

जाहिरात

 

प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

schedule18 Aug 26 person by visibility 180 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर -: ‘प्रत्येक नागरिकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. बदलत्या काळात नागरिकांनी आपल्या हक्कांसोबतच कर्तव्ये आणि कायद्याबाबत सजग राहणे गरजेचे आहे.’ असे मत गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी व्यक्त केले.   शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित ‘मुक्त संवाद’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी केंद्राच्या संचालक डॉ. प्रतिभा पाटणकर यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक गायकवाड यांचा ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती गायकवाड म्हणाल्या, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी आर्थिक फसवणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे. सायबर गुन्हे तसेच आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी शासनाने केलेल्या कायद्यांची नागरिकांनी माहिती करून घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये यासाठी कायद्याचे प्राथमिक ज्ञान आणि डिजिटल साक्षरता आवश्यक आहे.’कार्यक्रमात डॉ. सचिन भोसले यांनी स्वागत केले. डॉ. नितीन रणदिवे यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, विश्वनाथ वरुटे, डॉ. संजय चोपडे, डॉ. केतकी पोवार, डॉ. नगीना माळी, नाझिया मुल्लाणी, प्रियांका सुर्वे, डॉ. प्रकाश बेळीकट्टी, नवनाथ चव्हाण, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes