वीज कंत्राटी कामगारांकडे ऊर्जामंत्र्यांचे दुर्लक्ष, राज्यभर आंदोलन करणार
schedule10 Jul 24 person by visibility 1108 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांंच्या प्रलंंबित मागण्याकडे ऊर्जार्मत्री देवेंद्र फडणवींस हे दुर्लक्ष करत आहेत.कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्यभर उपोषण व आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने दिला आहे. आझाद मैदान येथून कंत्राटी कामगार संघाने हा इशारा दिला आहे.
वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न सरकार, प्रशासन स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, कंत्राटी कामगार विविध सनदशीर मार्गाने आंदोलने करत आहेत. अद्याप सरकारने दखल घेतली नाही, विधी मंडळात या बाबतीत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना सुध्दा वस्तुस्थिती न मांडता मुख्य मुद्दाच वगळला गेला असेही संघटनेने म्हटले आहे.
किमान वेतन चौदा ते पंधरा हजारावर कायम कामगारांच्या प्रमाणेच, रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांना वेतन वाढी बाबतीत वंचित ठेवू फक्त कायम कामगारांनाच वेतन वाढ घोषित करून कंत्राटी कामगारांची निराशाच केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कंत्राटी वीज कामगारांनी ९ जुलै रोजी आझाद मैदानावर लाक्षणिक निदर्शने केली. यापुळे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ महाराष्ट्र राज्यात जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर आमरण उपोषण करण्याचा ईशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ( संलग्न भारतीय मजदूर संघ ) अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.