विविध उपक्रमानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
schedule14 Apr 26 person by visibility 18 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभिवादन केले.
आमदार जयंत आसगावकर, महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपायुक्त परितोष कंकाळ, उपमहापौर अक्षय जरग आदी उपस्थित होते .
पालकमंत्री आबिटकर म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली .त्यांनी लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत केली.समाज परिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे सध्या काळाची गरज आहे.
माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनीही समयोचीत विचार व्यक्त केले. प्रारंभी पोलीस बॅण्ड पथकाने आपले सादरीकरण केले. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वस्तीगृहातील मुलींनी " जागर संविधानाचा " हे पथनाट्य सादर केले तसेच यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात काही विद्यार्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या.
याप्रसंगी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, राजीव आवळे,वसंतराव मुळीक ,विजय देवणे, कादर मलबारी, राजेश लाटकर, प्रा. शहाजी कांबळे, डी.जी भास्कर, उत्तम कांबळे, सुभाष देसाई आदी उपस्थित होते .