अध्यक्ष महायुतीचा, सत्ता महायुतीची म्हणता मग गोकुळमध्ये हसन मुश्रीफ इतके हतबल कसे काय ? सतेज पाटील
schedule13 Apr 26 person by visibility 168 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : " गोकुळमध्ये आम्ही चोख कारभार केला. सहकारी संस्था या राजकारणविरहीत असावेत अशी भूमिका आहे. आता गोकुळ मध्ये जे सध्या सुरू आहे, तो महायुतीतला अंतर्गत वाद आहे, महायुती बघून घेईल. अध्यक्ष महायुतीचा सत्ता महायुतीची आहे म्हणता, मग मंत्री हसन मुश्रीफ इतके हतबल कसे काय? त्यांना मी खाजगीत विचारणार आहे. नेमके गोकुळमध्ये काय चालले आहे? " अशी टिप्पणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी केली.
कोल्हापूर काँग्रेस कमिटीत संघटन सृजन अभियानचा शुभारंभ सोमवारी झाला. याप्रसंगी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांचे गोकुळमधील घडामोडीकडे लक्ष वेधले. भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळमध्ये मंत्र्यांच्या आशीर्वादाने गैरकारभार घडत आहे. चुकीच्या पद्धतीने वाढीव संस्थांना मंजुरी दिली आहे आणि या साऱ्या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ईडीमार्फत त्यांनी चौकशी झाली पाहिजे. आम्ही सगळे महायुतीचे घटक असलो तरी गोकुळमधील भ्रष्टाचार कसा खपवून घेऊ? असा प्रश्नही आमदार शिवाजी पाटील यांनी उपस्थित केला आहे. आमदार पाटील यांच्या या विधानावर बोलताना मंत्री मुश्रीफ यांनीही, " त्यांचा गैरसमज झाला आहे. आमदार शिवाजी पाटील यांना संस्था नोंदणीची प्रक्रिया समजावून सांगू त्यांचा बोलवता धनी वेगळा दिसतो असा टोला लगावला होता.
[ महायुतीच्या नेत्यांमधील यावादासंदर्भात पत्रकाराने आमदार सतेज पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यावर आमदार पाटील म्हणाले, " महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने शिवसेनेची सत्तेसाठी हतबलता दिसून येत आहे. महायुतीत सत्ता असतानाही नेते मंडळींची काय अवस्था आहे? हे साऱ्यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून पाहिले. गोकुळमधील वाद हा महायुतीतील आहे. कोण कोणावर आरोप करत आहेत, महायुतीने बघून घ्यावे. गोकुळचा कारभार आम्ही चोखपणे केला. तिथे कधी आम्ही काँग्रेसचा अध्यक्ष झाला, महाविकास आघाडीचा अध्यक्ष झाला असे म्हटले नाही. मी आमदार शिवाजी पाटील यांनाही सांगणार आहे की राजकारणामध्ये गोकुळ या संस्थेची बदनामी होऊ नये. शिवाय मंत्री मुश्रीफ यांनाही भेटल्यानंतर खाजगीत विचारणार आहे गोकुळमध्ये सध्या काय चालले आहे? अध्यक्ष महायुतीचा, सत्ता महायुतीची आहे म्हणता मग मंत्री मुश्रीफ ईतके हतबल कसे काय दिसतात?" असेही पाटील म्हणाले.