Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अध्यक्ष महायुतीचा, सत्ता महायुतीची म्हणता मग गोकुळमध्ये हसन मुश्रीफ इतके हतबल कसे काय ? सतेज पाटीलदोन वर्षात कन्व्हेन्शन सेंटरचे काम पूर्णत्वास येईल, कोल्हापूरच्या विकासात हे सेंटर मैलाचा दगड ठरेल : आमदार राजेश क्षीरसागर प्रा. विनय पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सतरा एप्रिलला सत्कार सोहळा, गौरव ग्रंथाचे प्रकाशनवाढीव सभासद संस्थेवरुन गोकुळमध्ये महायुतीमध्ये झुंपली ! मंत्री मुश्रीफ - आमदार शिवाजी पाटील आमनेसामनेआमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ! विविध सामाजिक उपक्रम, गर्दीचा महापूर! !कोल्हापुरातील ब्राह्मण शेतकरी मेळाव्याला प्रतिसाद ! पुरस्कार वितरण, तज्ज्ञांची व्याख्याने ! !णण तयकोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव- बसव जयंती कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजनपंजाबराव डख म्हणाले, १९ ते २६ एप्रिल या कालावधीत पाऊस अन् गारपीठ…कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका- कोल्हापूर फर्स्ट एकत्र काम करणार

जाहिरात

 

दोन वर्षात कन्व्हेन्शन सेंटरचे काम पूर्णत्वास येईल, कोल्हापूरच्या विकासात हे सेंटर मैलाचा दगड ठरेल : आमदार राजेश क्षीरसागर

schedule13 Apr 26 person by visibility 103 categoryमहानगरपालिका

कोल्हापुरात साकारत असलेले  कन्व्हेन्शन शंकरे शहर व जिल्ह्याच्या विकासात महिलाचे दगड ठरेल. दोन वर्षात या सेंटरचे काम पूर्णत्वास  असेल  असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. राजाराम तलाव नजीक सुरू असलेल्या   या सेंटरच्या कामाची पाहणी केली तसेच अधिकारी व ठेकेदारांना या संदर्भात सूचना केल्या.     कोल्हापूर जिल्ह्यात आधुनिक सोयी सुविधांनी युक्त आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर निर्मिती करण्याची मागणी क्षीरसागर यांनी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करून आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास प्रशासकीय मंजुरी दिली होती. यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली होती. निधी प्रशासनाकडे वर्ग झाला असून, कन्व्हेन्शन सेंटरच्या कामास गती प्राप्त झाली आहे. येत्या काळात कन्व्हेन्शन सेंटर मुळे कोल्हापूरच्या औद्योगिक, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाणार असून, कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास  क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 

  क्षीरसागर यांनी, प्रकल्पाच्या कामात कोणताही विलंब होऊ नये, तो दिलेल्या मुदतीतच पूर्ण व्हावा, कामाचा दर्जा उत्कृष्ठच असावा, यामध्ये कोणतीही हयगय चालणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांना याकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. हे केंद्र केवळ राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठीच मर्यादित न राहता, उद्योग, व्यापार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मोठ्या परिषदांसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे हे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसे असावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

 दोन वर्षात कन्व्हेन्शन सेंटरचे काम पूर्णत्वास येईल

 आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर मध्ये सुमारे २,००० आसनक्षमतेचे सभागृह, बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स हॉल, १५०० आसनक्षमतेचे ॲम्फीथिएटर, कॅफेटेरिया, एक्स्झीबिशन सेंटर अशा आधुनिक सुविधा असतील. या सुविधा आय.टी.पार्क, विविध सामाजिक  संस्था, शैक्षणिक संस्था, उद्योजक तसेच कोल्हापूरच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी निश्चितच लाभदायक ठरतील.  या कामांना सुमारे दोन वर्षाचा कालावधी अपेक्षित असून, या कालावधीत कन्व्हेन्शन सेंटरचे काम पूर्णत्वास येईल, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.यिवेळी महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, शहर अभियंता रमेश मस्कर, शहर नगर रचनाकार एन एस पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes